IMPIMP

Pune Crime News | पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरात दोन खून; कात्रज, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह परिसरातील घटना

by sachinsitapure

पुणे :  – Pune Crime News | शहरामध्ये लोकसभा निवडणुकीची (Pune Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु असताना दोन खुनाच्या (Murder In Katraj) घटना घडल्या आहेत. कात्रज, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह परिसरात (Murder Near Laxmi Narayan Theatre) या घटना घडल्या आहेत. कात्रज भागातील दत्तनगर परिसरात (Datta Nagar Katraj) एका भाजी विक्रेत्याच्या डोक्यात दगड व विट घालून खून करण्यात आला (Pune Murder Case). भाजी विक्री व्यवसायाच्या वादातून खून झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तर लक्ष्मीनारायण चित्रपटगृह परिसरात एकाचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी उघडकीस आली. खून झालेल्याची ओळख पटली नसून आरोपीने स्वत: पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्ह्याची कबुली दिली .

विलास जयवंत बांदल (वय 52, रा.त्रिमुर्ती रेसिडन्सी, वंडर सिटीजवळ, कात्रज) असे खून झालेल्या भाजी विक्रेत्याचे नाव आहे. कात्रज बाह्यवळण मार्गावर दत्तनगर बस थांब्याजवळ बांदल यांच्या डोक्यात दगड व वीट घालून त्यांचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. याबाबत अभिषेक विलास बंदाल (वय-24) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्य़ाद दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील (Sr PI Dashrath Patil), गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. प्राथमिक तपासात बांदल यांचा खून भाजी विक्री व्यवसायाच्या वादातून दोघांनी केल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक परदेशी करीत आहेत.

खुनी पोलीस ठाण्यात हजर

लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ एकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून करण्यात आल्याची घटना रविवारी (दि.5) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. खून झालेली व्यक्ती फिरस्ती असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी गौतम घनश्याम तुरुपमारे (वय 36, रा. फिरस्ता मार्केटयार्ड मुळ रा. सावरगाव पो. माघळमोही, ता. गेवराई जी. बीड) याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Polic Station) स्वत: हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार किशोर पोटे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद दिली आहे.

लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ असलेल्या भुयारी मार्गात भिक्षेकरी आसरा घेतात. भुयारी मार्गात काहीजण अमली पदार्थांचे सेवन करतात. अमली पदार्थांची नशा करताना झालेल्या वादातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपी गौतम मजूरी करतो. तो फिरस्ता आसल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

Related Posts