IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या बिबवेवाडीत इंजिनिअरकडून एकाचा चाकूने भोकसून खून; कारण समोर आल्यानंतर पोलिसही झाले हैराण

by nagesh
Pune Crime News | A 13-year-old girl was killed and thrown into the canal, the father tried to commit suicide by drinking poison

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | बांधकामाचा कचरा शेजारच्या घरावर पडल्याने झालेल्या वादातून इंजिनिअरने (Engineer) रागाच्या भरात एकाचा खून (Murder in Pune) केल्याची खळबळजनक घटना पुण्यातील (Pune Crime) बिबवेवाडी (Bibvewadi) परिसरात घडली आहे. ही घटना आज (सोमवारी) सकाळी दहाच्या सुमारास बिबवेवाडी सुखसागर नगर (Sukhsagar Nagar Bibvewadi) भाग 2 येथे घडली आहे. आरोपी इंजिनीअरने छातीत चाकू भोकसून खून (Pune Crime) केला. खूनाचे कारण समोर आल्यानंतर पोलिस अधिकारी देखील चक्रावून गेले. अतिशय क्षुल्लक कारणावरून खून झालेला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शरद सीताराम पुरी Sharad Sitaram Puri (वय-39 रा. सुखसागर नगर, लेन नं.5, श्रीनाथ बिल्डिंग, 3 रा मजला, सुखसागर नगर भाग 2 कात्रज –
Katraj) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सचिन विठ्ठल कपटकर Sachin Vitthal Kapatkar (वय-46 रा. अर्णव बंगला, सुखसागरनगर भाग -2
कात्रज) असे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत भरत सिताराम पुरी Bharat Sitaram Puri (वय-39) यांनी
बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibwewadi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या शेजारी राहतात. फिर्यादी यांचे नवीन घराचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामाचा (Construction) कचरा (रॅबीट) आरोपी सचिन कपटरकर यांच्या गाडीवर आणि बंगल्याच्या कंपाउंडमध्ये पडले. यावरुन आरोपी आणि फिर्यादी यांचा भाऊ शरद यांच्यात वाद झाला. आरोपीने शरद याला शिवीगाळ करुन हातातील धारदार चाकूने शरद पुरी याच्या डाव्या छातीजवळ भोकसला. यामध्ये गंभीर जखमी होऊन शरद यांचा मृत्यू झाला. तसेच फिर्यादी यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखून मारण्याची धमकी दिली. आरोपी कपटकर हा इलेक्ट्रिकल इंजिनिअर (Electrical Engineer) असून सध्या त्याला कोणतेच काम नसल्याने तो घरीच असतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande), बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल झावरे (Senior Police Inspector Sunil Zaware) , पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे (API Pravin Kalukhe) करीत आहेत.

 

Web Title: Pune Crime | One stabbed to death by engineer in Bibvewadi, Pune; Bibvewadi police station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी ! शिरसाई मंदिरात चोरी करणारी टोळी गजाआड, 25 मंदिरातील चोरीचे गुन्हे उघड

Dr Neelam Gorhe | अष्टविनायक तीर्थक्षेत्रस्थळी पायाभूत विकासाची कामे वेळेत पूर्ण करावीत – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

Pune Corona Updates | पुणेकरांची चिंता कायम ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3 हजारांहून अधिक रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts