IMPIMP

Pune Crime | पुण्यात गांजाची विक्री करणाऱ्या परप्रांतिय टोळीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 12 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त

by nagesh
une Crime News | The four who kidnapped and abducted the contractor were chased and imprisoned

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे रेल्वे स्टेशन (Pune Railway Station) परिसरात आणि कोंढवा परिसरात (Kondhwa) गांजाची विक्री करणाऱ्या परराज्यातील आरोपींना गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक (Anti Narcotic Cell, Pune) एकने बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. पथकाने दोन ठिकाणी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत 12 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करुन सहा जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गांजा (Marijuana), अफीम (Opium) जप्त करण्यात (Pune Crime) आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सिमान शामसुंदर लिमा (वय-60 रा. मु. राजझुक्का गाव पोस्ट गुलबा, थाना ओडबा, जि. गजपती राज्य ओडिशा-Odisha), अनिलकुमार हरीराम जानी (वय-33 रा. साईनगर, लेन नं. 8 कोंढवा बु. मुळ रा.जि. जलोर राजस्थान-Rajasthan), सुनिलकुमार भागीरथराम बिष्णोई (वय-21 मुळ रा. इसरोल, जि. जालोर राजस्थान), कमलेश सदराम बिष्णोई (वय-21 मुळ रा. धोरीमणा जि. बाढमेयर राजस्थान), सुरेशकुमार किसणाराम बिष्णोई (वय-22 मुळ रा. भुत्तेल ता. चितलवणा राजस्थान), मनोहरलाल भगवानाराम बिष्णोई (वय-30 रा. मुळ रा. पनोरीयावा, ता. सेडवा राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.7) करण्यात आली. (Pune Crime)

 

 

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस अधिकारी पेट्रोलिंग करत असताना पुणे रेल्वे स्टेशन येथील आरपीएफ पार्सल चेक पॉईंट गेट (RPF Parcel Check Point Gate) समोरील सार्वजनिक रोडवर एक वयस्कर व्यक्ती आढळून आला. त्याच्याकडे असलेल्या सॅकची तपासणी केली असता त्यामध्ये 1 लाख 31 हजार 420 रुपये किमतीचा 6 किलो 621 ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

 

कोंढवा येथील कारवाईत 11.71 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

दरम्यान पथकाला कोंढवा परिसरातील साईनगर मधील रो-हाऊस मध्ये 3-4 जण राहात असुन ते राहत्या घरातून अवैधरित्या अफिम व दोडा चुरा अशा अंमली पदार्थाचा (Drugs) साठा करुन त्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रो-हाऊसवर छापा टाकून सुनिलकुमार बिष्णोई व त्याच्या इतर साथिदारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 7 लाख 79 हजार 540 रुपये किमतीचा 394 ग्रॅम 770 मिली ग्रॅम वजनाचे अफीम, 3 लाख 30 हजार रुपये किमतीचे 22 किलो अफुची बोंडे व दोडा चुरा तसेच 2 हजार रुपये किमतीचे 2 इलेक्ट्रॉनिक काटे, 50 हजार रुपयांचे 5 मोबाईल असा एकूण 11 लाख 71 हजार 540
रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात
(Kondhwa Police Station) एनडीपीएस अॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड
(Police Inspector Vinayak Gaikwad), सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे
(API Laxman Dhengale), पोलीस अंमलदार मारुती पारधी, संदिप जाधव,
राहुल जोशी, मनोज साळुंके, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर,
विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Anti Narcotic Cell exposes gang selling cannabis in Pune, seizes 12 lakh 50 thousand items

 

हे देखील वाचा :

Sharad Pawar | ‘शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना सोडणार नाही’; राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

Flat Stomach Tips | बाहेर आलेले पोट जास्त मेहनत न करता कमी करायचे असेल, तर ‘हे’ आवश्य वाचा

Vasant More | शहराध्यक्षपद काढून घेतल्यानंतर मनसे नेते वसंत मोरे यांना पुणे पोलिसांकडून नोटीस

 

Related Posts