IMPIMP

Sharad Pawar | ‘शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना सोडणार नाही’; राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

by nagesh
Sharad Pawar-Silver Oak Attack Case | ncp chief sharad pawar allegation on bjp over msrtc workers issue and silver oak attack case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sharad Pawar | मागील चार ते पाच महिन्यापासून एसटी कामगारांचा राज्यव्यापी संप (ST Workers Strike) सुरु आहे. त्या दरम्यान मुंबईच्या आझाद मैदानामध्ये (Azad Maidan, Mumbai) एसटी कामगार (ST Employees) आपल्या मागण्यासाठी आणि महत्वाचे म्हणजे एसटीचे राज्य शासनात (Maharashtra State Government) विलिनीकरणाच्या मागणीसाठी ठाण मांडून होते. काल संप मिटला म्हणून जाहीर केले असतानाच आज मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळाले. आज एसटी कामगारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) निवासस्थानी गोंधळ घातला आहे. यावेळी कामगारांनी दगड, चप्पला देखील फेकल्या असल्याने मोठा गदारोळ माजला. (MSRTC Worker News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुन्हा एकदा एसटी कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने राज्यात वातावरण तापल्याचं दिसत आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी कामगार आंदोलन करत असल्याने आंदोलन चिघळल्याचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यावेळी पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली आहे. सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (IPS Vishwas Nangre Patil) यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिका-यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी धाव घेतली आहे.

 

 

संतप्त एसटी कामगार शरद पवारांच्या निवासस्थानी सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. शरद पवार, अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. एसटी विलिनीकरणासाठी 117 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. मात्र सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. तर, शरद पवारांच्या घरावर आंदोलन होत असल्याचं समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचेही कार्यकर्ते शरद पवार यांच्या घराबाहेर जमले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे
(Narendra Rane) यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यावेळी गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte)
यांनीच कर्मचाऱ्यांनाच भडकावून शरद पवारांच्या घरी हल्ला करण्यास सांगितले.
अनेक कर्मचारी दारू पिऊन याठिकाणी आले होते. सदावर्तेंना आम्ही सोडणार नाही. हिंमत असेल तर त्यांनी येऊन दाखवावं,
असं थेट आव्हानाच त्यांनी केलं आहे. तर, आझाद मैदानावर संप चालू होता. सरकारशी बोलणी सुरू होती. कोर्टात प्रकरण आहे.
कर्मचाऱ्यांना बोलण्याची संधी दिली होती. पण, याप्रकरणाचा हल्ला खपवून घेणार नाही,”
असा इशारा देखील नरेंद्र राणे यांनी दिला आहे.

 

Web Title :- Sharad Pawar | NCP chief sharad pawar ncp threatens gunratna sadavarte over protest in front of sharad pawars house

 

हे देखील वाचा :

Flat Stomach Tips | बाहेर आलेले पोट जास्त मेहनत न करता कमी करायचे असेल, तर ‘हे’ आवश्य वाचा

Vasant More | शहराध्यक्षपद काढून घेतल्यानंतर मनसे नेते वसंत मोरे यांना पुणे पोलिसांकडून नोटीस

Yami Gautam Insulted | यामी गौतमचा प्रसिद्ध डिझायनरनं केला होता भयंकर अपमान, त्याचवेळी तिनं घेतला ‘हा’ निर्णय….

 

Related Posts