IMPIMP

Pune Crime | पुण्यातील लोणीकंद परिसरात पाळीव श्वानावरून शेजाऱ्यांमध्ये ‘राडा’, 4 जणांवर FIR

by nagesh
Pune Crime News | Yerwada Police Arrest Tadipaar Criminal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पाळलेल्या कुत्र्यावरून (Pet Dog) दोन शेजाऱ्यांमध्ये वाद होऊन चार जणांनी एकाला लोखंडी पाईपाने बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) लोणीकंद परिसरात (Lonikand) घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) चार जणावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार तळेरानवाडी (Taleranwadi) येथे 17 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडला होता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

किरण साळुंके (Kiran Salunke), करण साळुंके (Karan Salunke), सुवर्णा साळुंके (Suvarna Salunke), विजय शेखर पवार (Vijay Shekhar Pawar) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत विजय सोपान कलबंड Vijay Sopan Kalband (रा. मु.पो. केसनंद, तळेरानवाडी, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) बुधवारी (दि.30) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तक्रार अर्जावरुन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

सहायक पोलीस निरीक्षक सुहास पाटील (API Suhas Patil) यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे शेजारी शेजारी (Neighbors) राहण्यास आहेत. फिर्यादी यांनी पाळलेले कुत्र किरण साळुंके यांच्यावर भुंकल्याने त्यांच्यात वाद झाले. आरोपी किरण याने फिर्यादी यांना खोऱ्याने मारहाण केली तर करण याने लोखंडी पाईपाने बेदम मारहाण केली. हे वाद सोडवण्यासाठी फिर्यादी यांची पत्नी मध्ये आली असताना किरण याने फिर्यादीच्या पत्नीला केसाला धरुन ओढले. यामध्ये पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाले. तसेत आरोपींनी फिर्यादी यांच्या खिशातील 14 हजार रुपये काढून घेतले. फिर्यादी यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुहास पाटील करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Rada among neighbors from pet dogs in Lonikanda area of Pune; FIR against 4 persons

 

हे देखील वाचा :

Chris Rock On Will Smith Slap Controversy | विल स्मिथच्या ‘गालफटा’वर अखेर क्रिस रॉकनं तोडलं मौन; म्हणाला – ‘मी अजून विचार करतोय नक्की काय झालं होत?’

Ajit Pawar On MSRTC Workers Strike | अजित पवारांचा अखेरचा इशारा; म्हणाले – ‘शिस्तीत गाडीत बसा नाही तर…’

Maharashtra Government Relaxes Covid Restrictions | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात कोरोनावरील सर्व निर्बंध हटवले, जाणून घ्या मास्क मुक्तीबाबत काय झालं ?

 

Related Posts