IMPIMP

Pune Crime | बोनसमधील रक्कम पार्टीसाठी देण्यास नकार; येरवड्यात तरूणावर सपासप वार करून खुनाचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Chatushringi Police Station - Beating on forehead with scissors for minor reason

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कंपनीकडून मिळालेल्या बोनसपैकी ८ हजार रुपये पार्टीसाठी देण्यास नकार दिल्याने टोळक्याने तरुणावर पालघन, तलवारीने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerwada Police Station) चौघांना अटक (Pune Crime) केली आहे.

 

स्वप्नील भालेराव, अश्पाक सय्यद, रोहित ब्रम्हराक्षे आणि हुजेफ शेख (सर्व रा. श्रमिक वसाहत, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत नागेश सुधाकर कोपे (वय ३०, रा. एकता सोसायटीनगर, विश्रांतवाडी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद (Pune Crime) दिली आहे.
ही घटना श्रमिक वसाहत येथील ढबळ समोरील मोकळ्या जागेत ६ नोव्हेबरला पहाटे ४ वाजता घडली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे ओळखीचे आहेत. फिर्यादी यांना कंपनीकडून बोनस मिळाला होता.
हे आरोपींना माहिती झाले. तेव्हा त्यांनी बोनसपैकी ८ हजार रुपये पार्टी करण्यासाठी फिर्यादीकडे मागितले.
त्याला फिर्यादी यांनी नकार दिला. तसेच अशपाक सय्यद याच्याविरुद्ध फिर्यादी यांनी ६ महिन्यांपूर्वी तक्रार दिली होती.
त्याचाही आरोपींना राग होता. पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांनी पालघन, तलवार तसेच बांबुने मारहाण करुन फिर्यादी यांना गंभीर जखमी केले.
तसेच परिसरात दहशत पसरविली. पोलीस उपनिरीक्षक गुरव तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Refusal to pay the amount in bonuses to the party; Attempt to murder by stabbing a youth in Yerwada

 

हे देखील वाचा :

ITR Filing | फॉर्म 16 शिवाय भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न, सविस्तर जाणून घ्या पद्धत

Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल, प्रचंड खळबळ

Needleless Vaccine | कोरोनाची बिगर इंजेक्शनची लस सुद्धा देणार सरकार, 1 कोटी डोस खरेदीचा आदेश

 

Related Posts