IMPIMP

Pune Crime | पुण्यातील एमजी रोडवर होतेय नामांकित कंपनीच्या बनावट कपड्यांची विक्री, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime | Sale of fake clothes of a well-known company on MG Road in Pune, 22 lakh worth of goods seized

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्यातील एमजी रोडवर कपडे (MG Road) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण एमजी रोडवरील काही दुकानांमध्ये एडिडास (Adidas), नाईकी (Nike), अंडर आर्मर (Under Armor) यासारख्या प्रसिद्ध कंपन्यांचे लोगो लावून बानावट कपडे विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) चार जणांविरुद्ध कॉपीराईट कायदा अंतर्गत (Copyright Act) गुन्हा (FIR) दाखल करुन तब्बल 22 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई (Pune Crime) सोमवारी (दि.29) करण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

लष्कर पोलिसांनी एमजी रोडवरील फ्रेन्डझ अल्वेझ (Friends Always), क्रिष्णा फॅशन वेअर (Krishna Fashion Wear), हुमा गारमेंट Huma Garment (न्यु फॅशन गारमेंट-New Fashion Garment), ब्रदर्स मेन्स वेअर (Brothers Men’s Wear) या दुकानांवर कारवाई केली. या कारवाईत एडिडास, नाइकी, अंडर आर्मर, आणि नाईकी या कंपन्यांचे 2681 बनावट लाँस, जैकेट, शर्ट, जर्सी असा एकूण 22 लाख 39 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी शाहीद जमाल खान (रा.भवानी पेठ), सागर महेंद्र आहेर (रा. वानवडी), सद्दाम चांद शेख (रा. ताडीवाला रोड, पुणे) आणि एका अनोळखी व्यक्ती विरुद्ध कॉपीराईटचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत नरेंद्र श्रीसोवरन सिंह (Narendra Srisowaran Singh) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नवी दिल्ली येथील लेजस्ट आय.पी.आय सर्व्हिस कंपनीत (Least IPI Service Company) संचालक (Director) आहेत. या कंपनीने फिर्यादी यांना एडिडास नेक अंड आर्मर या कंपनीच्या कॉपीराईट व ट्रेडमार्क अॅक्ट (Trademark Act) नुसार कारवाई करण्याचे अधिकार दिली आहेत. फिर्यादी यांनी एम.जी. रोडवरील दुकानातील एडिडास, नाईकी या कपड्यांची खरेदी करुन ते कंपनीकडे पाठवून त्याची तपासणी केली. कंपनीने फिर्यादी यांनी पाठवलेले कपडे बनावट असल्याचा अहवाल फिर्यादी यांना दिला.

 

फिर्यादी यांनी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त (DCP) यांची भेट घेऊन एमजी रोडवर बनावट माल विक्री होत असल्याची माहिती देऊन कारवाई करण्यासाठी अर्ज दिला होता.
त्यानुसार पोलीस उपायुक्तांनी लष्कर पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते.
त्यानुसार पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार गायकवाड (API Shitalkumar Gaikwad),
पोलीस हवालदार मेंगे, कदम, पंच, कॉपीराईट संस्थेचे अधिकारी शब्बीर शेख,
नरेंद्र सिंग व इतर सात जणांच्या पथकाने सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एमजी रोडवरील फ्रेन्डझ अल्वेझ दुकानाची झडती घेतली.
त्यावेळी दुकानातील 9 लाख 69 हजार 500 रुपयांचे एडिडास कंपनीचे शॉट्स, नाईकी कंपनीचे जर्शी,
अंडर आर्मर कंपनीचे लाँस, जाकेट, असा मुद्देमाल जप्त करुन शाहीद खान याच्यावर गुन्हा दाखल केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तसेच क्रिष्णा फॅशन वेअर दुकानातून 6 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सागर आहेर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हुमा गारमेंट (न्यु फॅशन गारमेंट) येथून 4 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
करुन सदाम शेख याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तर ब्रदर्स मेन्स वेअर येथून 1 लाख 89 हजार 500 रुपयांची मुद्देमाल जप्त
करुन एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास लष्कर पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Sale of fake clothes of a well-known company on MG Road in Pune, 22 lakh worth of goods seized

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोने घसरले, चांदीत किरकोळ चमक, जाणून घ्या सराफा बाजारातील नवे दर

Pune Pimpri Crime | देहूरोड येथे घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, बचावासाठी मुलीने केला आरोपीवर चाकू हल्ला

Pune Crime | रेशनिंग धान्याचा काळाबाजार ! प्रेमचंद जैन, प्रकाश सोलंकी, प्रमोद सोलंकी यांच्यावर FIR , 17 लाखाचा मुद्देमाल जप्त

 

Related Posts