IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात पत्नीनेच गळा दाबून केला पतीचा खून; गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा केला होता बनाव

by nagesh
Mumbai Crime | mother murdered by son for greed of wealth dead body thrown in river of matheran

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरुन (Suspicion Of Character) त्रास देणार्‍या पतीचा गळा दाबून खून (Murder In Pune) केल्यानंतर त्याने गळफास (Suicide News) घेतल्याचा पत्नीने केलेला बनाव उत्तमनगर पोलिसांनी (Uttam Nagar Police) उघडकीस आणला असून पत्नीला अटक केली आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नंदिनी रमेश भिसे ऊर्फ नंदिनी राजू धस (वय ४०, रा. लांडगे निवास, उत्तमनगर) असे अटक केलेल्या पत्नीचे नाव आहे. रमेश भिसे असे खून केलेल्या पतीचे नाव आहे. हा प्रकार ५ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला होता. (Pune Crime)

 

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पी. एम. वाघमारे (API P.M. Waghmare) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश व नंदिनी हे पतीपत्नी असून रमेश हा काहीही कामधंदा करीत नव्हता. दारु पिऊन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार पैशांची मागणी करत. तिच्या माहेरच्या नातेवाईकांसमक्ष तिला अपमानास्पद वागणूक देत असे. ५ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता त्याने नंदिनी हिला स्वयंपाक करुन दिला नाही, या करणावरुन वादावादी झाली होती. त्यानंतर रमेश हा झोपला. तेव्हा नंदिनी हिने नॉयलॉन दोरीने त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याची बॉडी उठवून बसविली.

 

 

त्याच्या गळ्यात दोरी टाकून ती दोरी लोखंडी हुकास बांधली व पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा बनाव केला. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मुलाला व नातेवाईकांना बोलावून पतीने गळफास लावून घेतल्याचे दाखवून त्याचे गळ्यातील दोरी काढून त्याला फरशीवर झोपविले. त्यानंतर पोलिसांना रमेशने गळफास घेतल्याची माहिती दिली. रमेश याचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्यात रमेश याचा मृत्यु गळा आवळून झाल्याचा डॉक्टरांचा अहवाल आला. त्यावरुन पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन नंदिनी भिसे हिला अटक केली आहे. न्यायालयाने तिला १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : Pune Crime | Shocking ! In Pune, the wife strangled her husband to death; Pretend to have committed suicide by hanging

 

हे देखील वाचा :

Pune Crime | विभक्त झाल्यानंतर 3 वर्षांनी कौटुंबिक छळाचा गुन्हा; जेलमध्ये असताना फ्लॅटमध्ये घुसून लाखोंचा लंपास, न्यायालयाच्या दणक्यानंतर 4 वर्षांनी दरोड्याचा FIR, जाणून घ्या प्रकरण

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

Azaan On Loudspeaker | ‘महाविकास’चंही ठरलं ! अजानबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांचे मोठं वक्तव्य

 

Related Posts