IMPIMP

Pune Crime | पुण्यात 29 वर्षीय महिला पोलिस कर्मचार्‍याची आत्महत्या, पोलिस दलात प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचार्‍याने गळफास (Suicide) घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. महिला पोलिसानं आत्महत्या केल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील सहकारनगर पोलिस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) नोंद करण्यात (Pune Crime) आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पूजा दत्तात्रय कांबळे (29, रा. धनकवडी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलिसाचं नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पूजा कांबळे या पुणे ग्रामीण पोलिस (Pune Rural Police) दलात पोलिस कॉन्टेबल म्हणून दौंड पोलिस ठाण्यात (Daund Police Station) कार्यरत होत्या. धनकवडी परिसरात (Dhankawadi Area) त्या कुटुंबासह रहावयास होत्या. ज्यांचे कुटुंब एकत्र रहात होते. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्या त्यांच्या दुसर्‍या मजल्यावरील रूममध्ये गेल्या. त्या परत खाली न आल्याने त्यांच्या पतीने वर गेले. दरवाजा बंद असल्याने त्यांनी आवाज दिला. पूजा यांनी दरवाजा उघडण्यास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी खिडकी उघडून पाहिले. मात्र, आतमधील काही एक दिसत नव्हते.

 

पूजा यांच्या पतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
त्यावेळी पूजा यांनी गळफास घेतल्याचे त्यांना दिसले.
त्याच अवस्थेत त्यांना भारती विद्यापीठ हॉस्पीटलमध्ये (bharati vidyapeeth hospital ) उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रूग्णालयात (Sasoon Hospital) पाठविण्यात आला.
याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
घरगुती वादातून पूजा यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पूजा कांबळे या सध्या रजेवर होत्या अशी माहिती ग्रामीण पोलिस दलातील (Pune Rural Police) सुत्रांकडून मिळाली आहे.

 

Web Title : Pune Crime | suicide by hanging women police in pune rural

 

हे देखील वाचा :

Ahmednagar Crime | धक्कादायक ! पती-पत्नीची 10 वर्षीय मैथिलीसह गळफास घेऊन आत्महत्या, तिघांच्या ‘सुसाईड’मुळं अहमदनगरमध्ये प्रचंड खळबळ

Pune Crime | माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या पुतण्यांची घरे फोडून 1 किलो सोन्याच्या दागिन्यांसह 53 लाखांचा ऐवज लंपास

Pune Crime | भांडणात मध्यस्थी केल्याने सराईत गुन्हेगारासह चौघांकडून तरुणावर कोयत्याने वार

 

Related Posts