IMPIMP

Pune Crime | तडीपारी संपलेल्या गुन्हेगाराने ५५ वर्षाच्या आईला केली मारहाण; शनिवार पेठेतील घटना

by nagesh
Pune Crime | incident of attack on a school boy by a goon in kothrud area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | आईला माऊलीपासून अनेक उपमा दिल्या जातात. मात्र, याच आईवर आता छोट्या छोट्या कारणावरुन हात उचलण्याचे धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले आहेत. कबतुर घरात का घेऊन आला असे विचारल्याने एका तडीपारी संपल्याने घरी आलेल्या गुन्हेगाराने आपल्या ५५ वर्षाच्या आईला उलथण्याने व झाडूने मारहाण केली. सासूला सोडविण्यासाठी आलेल्या सुनेलाही त्याने मारहाण केली. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police Station) जय राजेश भोसले Jay Rajesh Bhosale (रा. साई कॉम्प्लेक्स, शनिवार पेठ) याला अटक केली आहे. याबाबत त्याची आई उर्मिला राजेश भोसले (वय ५५) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी सकाळी साडेअकरा वाजता राहत्या घरात घडली. (Pune Crime)

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय भोसले याला फरासखाना पोलिसांनी तडीपार केले होते. सुमारे १५ दिवसांपूर्वी त्याची तडीपारीची मुदत संपल्याने तो शनिवार पेठेतील घरी येऊन राहु लागला. जय भोसले हा रविवारी सकाळी कबुतर घरात घेऊन आला होता. तेव्हा कबुतर घाण करतात, त्याला घरी का आणले असे त्याच्या आईने त्याला विचारले. त्यावरुन त्याने आईबरोबर वाद घातला. वाद वाढल्याने त्याने आपल्या आईला स्वयंपाक घरातील उलथण्याने मारले. तसेच घरातील झाडु घेऊन त्याने मारहाण करुन लागला. हे पाहून जय याची पत्नी आपल्या सासूला सोडविण्यासाठी मध्ये पडली. तेव्हा त्याने तिलाही हाताने मारहाण केली. आपल्याच मुलाने आपल्यावर हात उचलल्याने शेवटी आईने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी त्याला अटक केली असून हवालदार गणेश भुजबळ अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Tadipar Criminal beat his mother incident of shaniwar peth area

 

हे देखील वाचा :

Pune Crime | खुनाच्या गुन्ह्यातून 8 वर्षांनी निर्दोष सुटला, स्वसंरक्षणार्थ पिस्टल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला

Driving License Address Change | घरबसल्या ऑनलाइन बदलू शकता ड्रायव्हिंग लायसन्समधील पत्ता, कार्यालयात जाण्याची नाही गरज

Diabetes Food | मधुमेहींसाठी काळ्या हरभऱ्याचे पाणी वरदान, जाणून घ्या ते बनवण्याची आणि पिण्याची योग्य पद्धत

Pune Crime | तडीपार आरोपीने पोलिसांना कोयत्याचा धाक दाखवून केली धक्काबुक्की

 

Related Posts