IMPIMP

Pune Crime | पुण्यात संगमवाडी ते सादलबाबा चौकादरम्यान चोरट्यांची ‘दहशत’; जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Pune Crime | Former bjp corporator Dhananjay Jadhav beats msedcl official who came collect overdue electricity bill dattawadi police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पाटील इस्टेटकडून (patil estate, shivajinagar) येरवड्याला (Yerwada) जाण्यासाठी लांबचा असला तरी वाटेत सिग्नल नसल्याने लवकर जाता येते, म्हणून बहुसंख्य वाहनचालक या रस्त्याचा वापर करतात. मात्र, या रस्त्यावर मध्यरात्रीच्या वेळी चोरट्यांची दहशत असल्याचे दिसून आले आहे. रस्त्यावरुन जाणार्‍या येणार्‍यांना मारहाण करुन लुटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत असतात. संगमवाडी ते सादलबाबा चौकादरम्यान (Sangamwadi to Sadalbaba Chowk) एका टोळक्याने सायकलस्वारावर वार करुन त्याला लुटल्याचा (Pune Crime) धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

येरवडा पोलिसांनी याप्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांसह ७ जणांना पकडले आहे.
सनी रमेश पवार (वय १८), दीपक दत्ता पवार (वय २३), आसिफ सलीम शेख (वय २५), शुभम सुनिल देशपांडे (वय २२, सर्व रा. दिघी) अशी अटक (Pune Crime) केलेल्यांची नावे आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी मनिषकुमार उमाशंकर मिश्रा (वय २५, रा. रामनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे ४ नोव्हेबरला मध्यरात्री साडेबारा वाजता सायकलवरुन घरी जात होते.
यावेळी एका दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी (Pune Crime) केली.
त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांच्यातील एकाने फिर्यादींच्या अंगावर कोयत्याने वार (Attempt to Murder) केला.
त्यांच्या मनगटाला जखम झाली असताना ते जीव वाचविण्यासाठी पळत असताना त्यांचे इतर ७ साथीदार तीन दुचाकीवरुन आले
व त्यांनी फिर्यादींना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्याकडील २० हजार रुपये रोख व १० हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने चोरुन ते पळून (pune robbery news) गेले.
येरवडा पोलिसांनी (Yerwada Police Station) ७ जणांना पकडले असून पोलीस उपनिरीक्षक आळेकर तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | ‘Terror’ of thieves between Sangamwadi and Sadalbaba Chowk in Pune; Learn the case of pune robbery news

 

हे देखील वाचा :

Pune Crime | एकच फ्लॅट दोघांना विकणार्‍या बिल्डरवर गुन्हा दाखल; मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरची फसवणूक

Best healthy food for kids | मुलांना ताकदवान बनवायचे असेल तर खाऊ घाला ‘हे’ 6 पदार्थ, आजार राहतील दूर, जाणून फायदे

Pune News | बाणेर-बालेवाडी-पाषाण : काळ्या अंधारातून दीपावलीच्या निमित्ताने प्रकाशाकडे जाणारा ‘सुर संध्या’ एक चांगला कार्यक्रम – मुरलीधर मोहोळ

 

Related Posts