IMPIMP

Pune Crime | हातगाडी लावण्याच्या कारणावरुन तरुणावर ब्लेडने सपासप वार

by nagesh
Pune Crime | Thieves attack DSK Dreamcity security guards in Pune!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | हातगाडी लावण्याच्या कारणावरुन एका तरुणावर ब्लेडने सपासप वार केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या (bibvewadi Police Station) हद्दीत घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.31) दुपारी चारच्या सुमारास बिबवेवाडी येथील शनि मंदिराजवळ घडली आहे. याबाबत एकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

सय्यद अली पठाण Syed Ali Pathan (वय-30 रा. शनि मंदिराजवळ अप्पर बिबवेवाडी)
असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पठाण याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आकाश शिंदे Akash Shinde (30 रा. अप्पर बिबवेवाडी)
याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये हातगाडी लावण्यावरून वाद आहेत. दरम्यान आरोपी आकाश शिंदे याच्या आईन फिर्यादी यांच्या घरच्यांना हातगाडी लावण्याच्या जागेवरून शिवीगाळ केली.
पठाण याने आकाशला सांगितले की, तुझी आई विनाकारण माझ्या घरच्यांना हातगाडी लावण्याच्या
जागेच्या कारणावरुन शिवीगाळ करते. तेव्हा तू तिला सांग असे सांगितले.
याचा राग आल्याने आरोपी आकाश शिंदे याने पठाण याच्या गळ्यावर, उजव्या हतावर ब्लेडने
वार केले. यामध्ये जखमी झालेल्या पठाण याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात शिंदे विरोधात फिर्याद दिली.
त्यानुसार पोलिसांनी आकाश शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | The young man was stabbed in the arm by a blade

 

हे देखील वाचा :

Rangnath Vani | शिवसेनेचे माजी आमदार रंगनाथ वाणी यांचे निधन

Pune Crime Branch Police | जीवाच्या भितीने बाळगले पिस्टल अन् सापडला गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Pune Crime | कंपनीत काम देण्याच्या बहाण्याने तरुणीची फसवणूक

 

Related Posts