IMPIMP

Rangnath Vani | शिवसेनेचे माजी आमदार रंगनाथ वाणी यांचे निधन

by nagesh
ranganath wani shivsena ex mal demise sambhajinagar aurangabad

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन –  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व वैजापुरचे माजी आमदार रंगनाथ मुरलीधर उर्फ आर.एम. वाणी (Rangnath Vani) यांचे बुधवारी (1 सप्टेंबर) औरंगाबाद (Aurangabad) येथील खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले (passed away). ते 84 वर्षांचे होते. रंगनाथ वाणी (Rangnath Vani) यांनी 1999 ते 2014 या कालावधीत सलग तीन पंचवार्षिकमध्ये विधानसभेत वैजापूर मतदारसंघाचे (Vaijapur constituency) शिवसेनेतर्फे (Shivsena) प्रतिनिधीत्व केले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

रंगनाथ वाणी यांच्या पश्चात पत्नी, 4 विवाहीत मुले, सुना, नातवंडे असा परीवार आहे.
अल्पशा आजारामुळे त्यांना औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
माजी आमदार रंगनाथ वाणी यांच्यावर वैजापुरातील अमरधाम येथे सकाळी 11 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणात वाणी यांनी 1984 ते 1994 या कालावधीत वैजापूरचे नगराध्यक्षपद भूषविले. नांदुर मधमेश्वर (Nandur Madhameshwar) जलदगती कालव्यातुन पाणी आणण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सलग 39 दिवस आंदोलन केले.
त्याची दखल घेत राज्यपालांनी आंदोलकांची भेट घेतली होती.
त्यांचा प्रशासनावर चांगला वचक होता. नगरसेवक, नगराध्यक्ष ते आमदार असा त्यांचा राजकिय प्रवास राहिला.

 

Web Title : ranganath wani shivsena ex mal demise sambhajinagar aurangabad

 

हे देखील वाचा :

Pune Crime Branch Police | जीवाच्या भितीने बाळगले पिस्टल अन् सापडला गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Pune Crime | कंपनीत काम देण्याच्या बहाण्याने तरुणीची फसवणूक

Gmail Alert | तुम्हालाही असा ‘ई-मेल’ आला असेल तर व्हा सावधान, अन्यथा …

 

Related Posts