IMPIMP

Pune Crime Branch Police | जीवाच्या भितीने बाळगले पिस्टल अन् सापडला गुन्हे शाखेच्या जाळ्यात

by nagesh
Pune Crime | Koregaon police arrested the maid who stole silver gods and ornaments

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime Branch Police | पुणे पोलिसांच्या गुन्हे शखा युनिट एकच्या (Pune Crime Branch Police) पथकाने एका सराईत गुन्हेगाराला सापळा रचून अटक (Arrest) करुन त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्टल (Pistol) आणि एक जीवंत काडतूस (cartridge) जप्त केले आहे. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता त्याने 11 वर्षापूर्वी खून (Murder) केला होता. त्यामुळे त्याला भीती वाटत होती. त्यामुळे त्याने पिस्टल जवळ बाळगल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी ही कारवाई शुक्रवारी (दि.27) केली.

 

सचिन अप्पा रणदिवे Sachin Appa Ranadive (वय 31, रा. शनीनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते.
त्यावेळी अंमलदार दत्ता सोनवणे (Datta Sonawane) व महेश बामगुडे (Mahesh Bamgude)
यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन रणदिवे हा शंकरशेठ रोडवरील मिरा सोसायटी येथील रस्त्यावर उभा असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी सचिन रणदिवेला अटक केली.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 1 पिस्टल आणि 1 काडतुस असा एकूण 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याकडे केलेल्या चौकशी त्याने 2010 मध्ये एकाचा खून केला होता.
त्याच्यापासून त्याला जीवाची भीती वाटत होती.
त्यामुळे त्याने पिस्टल जवळ बाळगले असे आरोपीने सांगितले.
आरोपीवर पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) दलातील हवेली पोलीस ठाण्यात (Haveli police station) खुन, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे तीन गुन्हे दाखल आहेत.

 

ही कारवाई आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त (अति. कार्यभार अपर पोलीस आयुक्त गुन्हे) भाग्यश्री नेवटके (DCP Bhagyashree Newatke), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे
(DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe),
पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड
(PSI Sanjay Gaikwad), सनिल कुलकर्णी (PSI Sanil Kulkarni),
पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे, महेश बामगुडे, अशोक माने, शशीकांत दरेकर,
विजयसिंग वसावे यांनी ही कामगिरी केली.

 

Web Title : Pune Crime Branch Police | Fearing for his life, the pistol was found in the trap of the crime branch

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कंपनीत काम देण्याच्या बहाण्याने तरुणीची फसवणूक

Gmail Alert | तुम्हालाही असा ‘ई-मेल’ आला असेल तर व्हा सावधान, अन्यथा …

Jan Dhan खातेधारकांसाठी मोठी खुशखबर ! मोदी सरकार लवकर करू शकते घोषणा, जाणून घ्या कसा मिळेल फायदा?

 

Related Posts