IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या ‘नॅशनल केमिकल लॅबोरेटरी’मध्ये चंदनाच्या 10 झाडांची चोरी

by nagesh
Pune Crime | Theft of 10 sandalwood trees at National Chemical Laboratory, Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | ‘नॅशनल केमिकल लॅबोरेटरी’च्या आवारातील चंदनाची तब्बल 10 झाडे कापून चोरून नेण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार 21 ऑगस्ट रोजी घडला. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या एनसीएल कॉलनीमध्ये चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याप्रकरणी एनसीएलचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी पराग चिटणीस यांनी फिर्याद दिली आहे. पाषाण येथील एनसीएलला लागूनच एनसीएल कॉलनी आहे. या कॉलनीच्या आवारात चंदनाची झाडे आहेत. चोरट्यांनी या कॉलनीमध्ये असलेली चंदनाची दहा झाडे कापून चोरून नेली. तसेच कॉलनी शेजारी राहणारे राजीव फडतरे यांच्या घरा शेजारी असलेले चंदनाचे एक झाडही चोरट्यांनी कापून नेले. वास्तविक एनसीएलला कडक बंदोबस्त आहे. या परिसरात पोलिसांचा कायम वावर असतो. तसेच पोलिसांकडून गस्तही सुरू असते. देशातील अत्यंत महत्वाच्या संस्थापैकी एनसीएल ही एक संस्था आहे. सुरक्षेच्या गराड्यात असलेल्या या परिसरात चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

Web Title : Pune Crime | Theft of 10 sandalwood trees at National Chemical Laboratory, Pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | जमीन देण्याच्या बहाण्याने रिअल इस्टेट व्यावसायिकाची 3.2 कोटींची फसवणूक, दोघांवर FIR

Maharashtra Lockdown | राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार?; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! जर तुमच्याकडे सुद्धा असेल आहे ‘ही’ लिंक तर ताबडतोब करा डिलिट, बँकेने सांगितले ‘हे’ कारण?

 

Related Posts