IMPIMP

Pune Crime | लॉकडाऊनमुळे झाला बेरोजगार, लोकांचे पैसे देण्यासाठी केली सोनसाखळीची चोरी; खडक पोलिसांनी ठोकल्या बेड्या

by nagesh
Pune Crime | Unemployment due to lockdown, theft of gold chain to pay people; khadak police arrest one

पुणे न्यूज (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) कोरोना महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Corona Lockdown) अनेक जण बेरोजगार झाले आहेत. याच दरम्यान पुणे (Pune Crime) शहरामध्ये सोनसाखळी चोरीच्या (chain snatching) घटनांमध्ये मोठी वाढ झाली. सोनसाखळी चोरांचा शोध घेत असताना पुणे (Pune Crime) शहरातील खडक पोलिसांनी (khadak police) एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीने लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाल्यामुळे आणि लोकांचे पैसे देण्यासाठी सोनसाखळी चोरल्याची कबुली दिली आहे. आरोपीने देवदर्शन करुन परतणाऱ्या एका वृद्ध महिलेची तीन तोळ्यांची सोनसाखळी चोरल्याचे तपासात उघड झाले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अमोल विश्वनाथ शेरखाने (वय-36 रा. प्लॅट नं. 5, चंद्रभागा अपार्टमेंट, भेंडी चोंक, आंबेगाव,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी धर्मीबाई लक्ष्मीचंद जैन (वय-82 रा. काची आळी, रविवार पेठ, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात (khadak police station) फिर्याद दिली आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला 8 जुलै रोजी शुक्रवार पेठेतील (Shukrawar Peth) जैन मंदिरात (Jain Temple) देवदर्शनासाठी गेल्या होत्या. देवदर्शन करुन परत असताना आरोपीने महिलेचा पाठलाग केला. महिला त्यांच्या सुभानशादर्गा धोबी तालीम येथील घरी जात होत्या. सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील जिन्यातून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील 1 लाख 35 हजार रुपये किमतीची 3 तोळे वजनाची चेन हिसका मारुन चोरून नेल्याची तक्रार त्यांनी दिली होती.

 

 

पांढऱ्या डागामुळे आरोपी गजाआड

फिर्यादी महिला यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद देताना आरोपीच्या अंगावर पांढरे डाग असल्याचे सांगितले होते. तसेच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता एक व्यक्ती घाईगडबडीत चालत जाताना दिसला. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु असताना आरोपी हिराबाग (Hirabag) येथील एका स्नॅक्स दुकानाजवळ थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली.

 

 

कामधंदा नसल्याने केली चोरी

आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले की, लॉकडाऊनमुळे कामधंदा नव्हता. तसेच लोकांचे घेतलेले पैसे देणे लागत होते. यासाठी चोरी केल्याचे सांगितले. तसेच वडील आजारी असल्याचे खोटे कारण सांगून सोनारास विकणार असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune Police Commissioner Amitabh
Gupta), अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (Additional Commissioner of Police
Dr. Sanjay Shinde), पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 डॉ. प्रियंका नारनवरे (Deputy
Commissioner of Police Priyanka Narnaware) , सहायक पोलीस आयुक्त सतिश
गोवेकर (Assistant Commissioner of Police Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली खडक
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Senior Police Inspector Sreehari Bhairat),
पोलीस निरीक्षक (गुन्हे) हर्षवर्धन गाडे, सहायक पोलीस निरीक्षक सुशिल बोबडे, पोलीस उपनिरीक्षक
राहुल खंडाळे, विक्रम मिसाळ, राहुल घाडगे, पोलीस हवालदार फहिम सैय्यद, संदिप पाटील, अनिकेत
बाबर, रवी लोखंडे, पोलीस अंमलदार समीर माळवदकर, बंटी कांबळे, राहुल मोरे, हिम्मत होळकर,
कल्याण बोराडे, विशाल जाधव, किरण शितोळे, तेजस पांडे, दिनेश खरात यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime | Unemployment due to lockdown, theft of gold chain to pay people; khadak police arrest one

 

हे देखील वाचा :

Professor Vedkumar Vedalankar | मराठी सारस्वताचा मानबिंदू असणारी ‘ज्ञानेश्वरी’ आता हिंदी भाषेत अनुवादित होणार

Porn on Internet | 3000 रूपये भरा अन्यथा होईल अटक, पॉर्न पाहिल्याप्रकरणी बनावट नोटिसा पाठवून 1000 जणांना गंडवलं, केली 40 लाखाची कमाई

Pune Crime | आयुर्वेदिक ऑईलच्या व्यवसायाचे आमिष दाखवून सव्वा कोटींना घातला गंडा

 

Related Posts