IMPIMP

Pune Crime | ‘आमच्या घरी आजवर पोलीस आले नव्हते, म्हणणार्‍यांना पडल्या बेड्या’; जाणून घ्या पुण्यात भल्या पहाटे नेमकं काय घडलं

by nagesh
Pune Crime News | Innkeeper who stole from PMPML bus arrested, valuables seized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | पोलीस समजावण्यासाठी गेले असताना आजपर्यंत आमच्या घरी पोलीस आले नव्हते, तुम्ही पोलीस आमच्या घरी कसे आले, आमची तक्रार कोणी केली असे म्हणून पहाटेच्या सुमारास दारु पिऊन भर रस्त्यात आरडाओरडा करुन गोंधळ (Pune Crime) घालणार्‍या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police Station) अटक केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

मयांक संदीप पारखी Mayank Sandeep Parkhi (वय ३१, रा. आर एस एस कार्यालयासमोर, शनिवार पेठ) आणि आतिष समीर केकरे Atish Sameer Kekare (वय २३, रा. वसुंधरा अपार्टमेंट, प्रभात रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस नाईक भोसले यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवार पेठेत (Shaniwar Peth, Pune) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास लाऊड स्पिकर लावून काही जण गोंधळ घालत असल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाला नागरिकांनी कळविले. त्यानुसार पोलीस मार्शल भोसले हे तेथे गेले. तेथे तिघे जण दारु पिऊन मोठ मोठ्या आवाजात आरडाओरडा करीत होते. त्यांना भोसले यांनी समजाविले. तेव्हा त्यांनी अगोदर लाऊड स्पिकर बंद केला. पोलीस काही वेळ तेथेच थांबले असताना मयांक पारखी व आतिष केकरे खाली आले. त्यांनी भोसले यांना “आजपर्यंत पोलीस आमच्या घरी आले नव्हते. तुम्ही पोलीस आमच्या घरी कसे काय आले. आमची तक्रार कोणी केली,” असे म्हणून मोठमोठ्याने आरडाओरडा (Pune Crime) केला. फिर्यादी यांच्याबरोबर वाद घालून सार्वजनिक शांततेचा भंग करुन सरकारी कामात अडथळा आणला म्हणून त्यांच्यावर गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Pune Crime | Vishrambaug Police arrest Mayank Sandeep Parkhi and Atish Sameer Kekare for disturbing public peace

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पूर्व वैमनस्यातून 26 वर्षीय युवकाचा खून; दोघांवर FIR, तर एकजण पोलिसांच्या ताब्यात

ST Workers Strike | एसटी संपाचा तिढा सुटेना ! पुणे विभागातील 13 डेपो बंद; प्रवाशांची तारांबळ

Pune Crime | बोनसमधील रक्कम पार्टीसाठी देण्यास नकार; येरवड्यात तरूणावर सपासप वार करून खुनाचा प्रयत्न

 

Related Posts