IMPIMP

Pune Crime | पतीचे जावेसोबत प्रेमसंबंध, पत्नीने उचलले टोकाचे पाऊल; पुण्याच्या विश्रांतवाडी येथील टिंगरेनगर परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Wanwadi Police Station - Class 8 boy dies of cardiac arrest while playing cricket, tragic incident during summer vacation

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पतीचे जावेसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून पतीने पत्नीचा मानसिक छळ केला. पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. याप्रकरणी पती आणी जावेवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. विवाहितेने बुधवारी (दि.18) आत्महत्या केली. हा प्रकार विश्रांतवाडी येथील टिंगरेनगर येथे घडला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

विमल संदीप साळवे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर पती संदीप साळवे (Sandeep Salve) आणि जावेवर (दोघे रा. चंदन वजीर सोसायटी, फ्लॅट नं. 1 विद्यानगर रोड, टिंगरे नगर, विश्रांतवाडी) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मयत विमल यांचे वडील रमेश दगडु मेढे (वय-65 रा. आळंदी रोड, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमल साळवे आणि संदीप साळवे यांचे 2005 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर संदीप याने विमलच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वेळोवेळी मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच तो घरात सामान देखील देत नव्हता.
संदीप आणि मयत विमलची जाऊ यांच्यात प्रेमसंबंध होते.
त्यामुळे या दोघांनी विमलचा मानसिक (Mental) व शारिरीक (physical) छळ केला.
असा आरोप विमलच्या वडिलांनी केला आहे.
दोघांच्या त्रासाला वैतागून विमलने 18 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली.
पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस (Vishrantwadi Police) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | woman suicide in vishrantwadi area of pune, husband and others are booked

 

हे देखील वाचा :

Kolhapur Crime | अपत्य प्राप्तीसाठी नराधमाने डॉक्टर मित्राच्याच 7 वर्षाच्या मुलाचा दिला बळी! थरकाप उडवणारी घटना

Thane Crime Branch Police | जन आशीर्वाद यात्रेत खिसे कापणारी मालेगावची टोळी अटकेत; लाखोंचा ऐवज हस्तगत

BHR Scam | बीएचआरमध्ये ‘टेंडर’ भरणार्‍या अनेक व्यक्ती मुख्य आरोपीच्या ओळखीच्या; सुनील झंवरच्या कोठडीत वाढ

 

Related Posts