IMPIMP

Pune Cyber Crime News | पुणे : सायबर गुन्हेगारांचा पोलीस कर्मचाऱ्याला 7 लाखांचा गंडा

by sachinsitapure

पुणे : – Pune Cyber Crime News | शेअर बाजारात गुंतवणुकीच्या (Investment In Share Market) आमिषाने फसवणूकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. सायबर चोरट्यांकडून अनेक नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक (Online Cheating Fraud Case) आहे. चोरट्यांनी पुणे शहर पोलीस दलात (Pune City Police) कार्यरत असणाऱ्या एका पोलीस शिपायाची सात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांकडून आवाहन करुन देखील नागरिक सायबर चोरट्यांच्या भुलथापांना बळी पडत असून त्यांची लोखो रुपयांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत असताना चोरट्यांनी पोलिसालाच गंडा घातला आहे.

याबाबत 39 वर्षीय पोलीस शिपायाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोबाईल धारक व बँक खातेधारक यांच्यावर फसवणूक व आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 29 नोव्हेंबर 2023 रोजी ऑनलाईन घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात फिर्यादी पोलीस शिपाई यांनी सोशल मीडियावर एक जाहिरात पाहिली होती. शेअर बाजारात गुतवणूक केल्यास तिप्पट परतावा देण्याचे आमिष जाहिरातीत दाखविण्यात आले होते. जाहिरातीतील मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. त्यावेळी सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवले.

सायबर चोरट्यांनी त्यांना एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी अॅप डाऊनलोड केले. मागील आठ महिन्यांत त्यांनी चोरट्यांनी सांगितल्या प्रमाणे वेगवेगळ्या बँक खात्यात 7 लाख 4 हजार 500 रुपये जमा केले. त्यानंतर फिर्यादी यांनी अॅपद्वारे परताव्यापोटी जमा झालेली रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती रक्कम त्यांना मिळाली नाही. चोरट्यांचे मोबाईल बंद असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत तपास करत आहेत.

Related Posts