IMPIMP

Pune Cyber Crime News | पुणे: कोट्यवधींचा घोटाळा केल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकची फसवणूक

by sachinsitapure

पुणे :  – Pune Cyber Crime News | आधारकार्डाचा (Aadhar Card) वापर करुन कोणीतरी सिमकार्ड (Sim Card) घेऊन आठ कोटीचा घोटाळा केला असून तुम्हाला लखनौ पोलीस तुम्हाला अटक करतील, अशी भिती दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची सात लाख 29 हजार रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर फसवणुकीसह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 6 जून रोजी घडला आहे.

याबाबत जयप्रकाश अनंत साठे (वय-76 रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद (Shivaji Nagar Police Station) दिली आहे. यावरुन विवेक शर्मा, सुनिल कुमार मिश्रा तसेच विविध बँक खाते धारक यांच्यावर आयपीसी 419, 420 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ऑफिसला जात असताना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन आला.

समोरच्या व्यक्तीने फिर्यादी यांना सांगितले की, तुमच्या आधारकार्डचा वापर करुन कोणीतरी सिमकार्ड घेतले आहे. व त्या व्यक्तीने त्याद्वारे बेकायदेशीर कृत्य करुन आठ कोटींचा फ्रॉड केला आहे. याविरोधात केस दाखल झाली आहे. त्यामुळे लखनौ पोलीस तुम्हाला अटक करतील अशी भिती घातली. अटक टाळण्यासाठी आम्ही सांगू तसे करा व फोन सांगेल तो पर्यंत कट करायचा नाही असे सांगितले. त्यानंतर आयसीआयसीआय बँकेच्या मिन्टो पार्क येथील खात्यात 7 लाख 29 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. तसेच हे पैसे चार दिवसांनी परत मिळतील असे सांगितले. मात्र, आरोपींनी पैसे परत न पाठवता आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत करत आहेत.

Related Posts