IMPIMP

Pune L3 Bar Party Case | पुणे L3 बार पार्टी प्रकरण : ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या दोघांना अटक, आतापर्यंत 15 जण अटकेत

by sachinsitapure

पुणे : – Pune L3 Bar Party Case | पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील (FC Road Pune) एल थ्री बारमधील ड्रग्ज पार्टी प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. ड्रग्जचा पुरवठा केल्याप्रकरणी या दोघांना अटक केली आहे. ड्रग्ज पार्टी प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे. या प्रकरणात पुणे पोलीस (Pune Police) अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांकडून याप्रकरणात कसून तपास सुरु करण्यात आला आहे. (Pune Drugs Party Case)

एल थ्री बार ड्रग्ज पार्टी प्रकरणात ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. आर्यन पाटील आणि अक्षय स्वामी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्यांना 3 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिषेक सोनवणे या ड्रग्ज पेडलरने पार्टीसाठी हे ड्रग्ज आर्यन पाटील कडे दिले. त्यानंतर आर्यन पाटील याने ते ड्रग्ज इतरांकडे दिले. या प्रकरणात पुणे पोलिसांनी 15 जणांना अटक केली आहे.

पार्टीदरम्यान ड्रग्ज सेवन करणारे नितीन ठोंबरे (वय 34, रा. गोरेगाव, मुंबई) आाणि करण मिश्रा (वय 34, रा. मुंढवा) यांना गजाआड करण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये अभिषेक सोनवणे याने ठोंबरे आणि मिश्रा या दोघांना मेफेड्रोनची विक्री केल्याचे समोर आले आहे. चौकशीदरम्यान स्वामी, पाटील हे मेफेड्रोन विक्रीमध्ये सक्रिय असल्याचे समोर आले. या दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

Related Posts