IMPIMP

Pune Metro | पुणे, पिंपरी-चिंचवड मधील मेट्रो सेवा डिसेंबर अखेर सुरु होणार

by nagesh
Pune Metro | regular pune metro to run from sunday pune citizens will experience a pleasant journey at this ticket price

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  मागील अनेक वर्ष सुरु असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pune and Pimpri-Chinchwad) येथील मेट्रो प्रकल्पबाबत अखेर पूर्ण विराम मिळाला. आता या दोन्ही शहरातील (Pune Metro) मेट्रोची प्रवासी सेवा येत्या डिसेंबर (December) अखेर सुरू होणार आहे. वनाज ते रामवाडी (vanaz to ramwadi pune metro route) या मार्गाच्या अंतर्गत वनाज ते गरवारे महाविद्यालयादरम्यान (garware college) या 5 किलोमीटर लांबीच्या मार्गावर आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट (pimpri chinchwad to swargate) या मार्गावरील पिंपरी महापालिका ते फुगेवाडी या 7 किलोमीटर अंतरावर प्रवाशांसाठी वाहतूक डिसेंबर अखेर सुरू होणार आहे.

दिल्ली मेट्रोच्या (Delhi Metro) आधारे पुणे मेट्रो मार्गासाठी साठी तिकिट दर (Ticket rates) निश्चित केला आहे. पहिल्या एका किलोमीटरसाठी तिकिट दर 10 रुपये इतका असणार आहे.
त्यानंतर प्रवासाचे टप्पे आणि अंतर जसजसे वाढेल, तसतसा तिकिट दर कमी होईल.
मेट्रोमधून महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी ‘नारीशक्ती’ नावाचा स्वतंत्र डबा असणार आहे.
मेट्रो स्थानकावर आणि मेट्रो डब्यात सुरक्षिततेच्या हिशोबाने CCTV लावण्यात आली आहे.
अशी माहिती महामेट्रोचे (Mahametro) व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित (Dr. Brijesh Dixit) यांनी दिलीय.
तर, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील एकूण 12 किलोमीटर लांबीच्या अंतरात डिसेंबर अखेरपर्यंत प्रवासी सेवा सुरू होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पुढे ते म्हणाले, सर्व स्थानके आणि डब्यांमध्ये CCTV यंत्रणा असल्याने प्रवास सुरक्षित (Travel safe) होईल. सायकलला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आणि सायकलींचे शहर ही पुण्याची जुनी ओळख कायम ठेवण्यासाठी सायकलसह प्रवास करता येणार आहे.
सायकलचा वापर करून मेट्रो (Pune Metro) प्रवास करता येणार असल्याने पहिल्या आणि अखेरच्या टप्पापर्यंत 2 विविध प्रवास सुविधांचे एकत्रीकरण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

डॉ. ब्रिजेश दीक्षित (dr brijesh dixit) आणि मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फुगेवाडी स्थानक ते संत तुकारामनगर स्थानक (phugewadi station to sant tukaram nagar metro station) आणि संत तुकाराननगर स्थानक ते फुगेवाडी स्थानक असा प्रवास केला आहे.
या प्रवासा दरम्यान उदवाहकाद्वारे (Lift) सायकल फुगेवाडीच्या मेट्रो स्थानकाच्या फलाटावर आणण्यात आली. त्यानंतर मेट्रोच्या डब्यात सायकलसह प्रवेश केला गेला.
संत तुकारामनगर स्थानकात मेट्रो पोहोचल्यानंतर उदवाहकाद्वारे सायकल बाहेर आणण्यात आल्या.
त्याचे प्रात्यक्षिक (गुरुवारी) 26 ऑगस्ट रोजी दाखविण्यात आले आहे.

यावेळी डॉ. ब्रिजेश दीक्षित (Dr. Brijesh Dixit) यांनी सांगितलं आहे की, ‘मेट्रो (Pune Metro) डब्यामध्ये सायकलस्वारांसाठी योग्य ते सूचना फलक आणि मार्गदर्शक फलक लावण्यात येतील.
या उपक्रमाला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळेल.
सायकल आणि मेट्रोचा वापर करून विद्यार्थी, कामगार, कर्मचारी, महिला, वस्तू विक्रेते,
विविध वस्तू घरपोच पोहोचविणारे कर्मचारी यांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याचं म्हटलं आहे.

 

Web Title : pune metro | metro service pune pimpri end of december

 

हे देखील वाचा :

Anti-Corruption Sangli | 30 हजार रुपयाची लाच घेताना महिला अधिकार्‍यासह एक जण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Pune Court | हॉटेल चालकांकडून खंडणी वसुल करणार्‍या पोलिस उपनिरीक्षकाला जामीन

Army Recruitment Scam | पेपरफुटी प्रकरणी 2 मेजरसह आठ जणांचा जामीन फेटाळला; जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts