IMPIMP

Army Recruitment Scam | पेपरफुटी प्रकरणी 2 मेजरसह आठ जणांचा जामीन फेटाळला; जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Army Recruitment Scam | Eight people, including two majors, were denied bail in the Army Recruitment Scam case; Learn the case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  – Army Recruitment Scam | लष्कर भरती प्रक्रियेतील लेखी पेपर फुटी प्रकरणात (Army Recruitment Scam) अटक करण्यात आलेल्या आठ जणांचा जामीन अर्ज न्यायालायने फेटाळला आहे. विशेष न्यायाधीस एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला. जामीन फेटाळण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन मेजर आणि ॲकॅडमी चालकांचा समावेश आहे.

मेजर किशोर महादेव गिरी (वय ४०, रा. बारामती), माधव शेषराव गिती (ता. ३९, सॅपिअर विहान कॉलनी), गोपाळ युवराज कोळी (वय ३१, रा. दिघी कॅम्प, मुळ रा. जळगाव), उदय दत्तू औटी (वय २३, रा,. खडकी, मुळ रा. अहमदनगर), भारत लक्ष्मण अडकमोळ (वय ३७, रा. नगरदेवळा, जळगाव), मेजर थिरू मुरुगन थंगवेलू (वय ४७, रा. वेलिंग्टन, तमिळनाडू), वसंत विजय किलारी (वय ४५, रा. दिल्ली. मुळ रा. आंध्रप्रदेश), विरा प्रसाद कोटीस्वामी नारगेपाटी (वय ४१, रा. आंध्रप्रदेश) अशी जामीन फेटाळण्यात आलेल्यांची नावे आहेत. लष्कर भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेचा पेपर परिक्षेच्या एक दिवस आधी मिळण्यासाठी ॲकॅडमी चालक आरोपींनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून पाच लाख रुपये घेतले असल्याची धक्कादायत बाब तपासातून पुढे आली आहे. या गुन्ह्यात अटक चार आरोपींच्या राज्यात विविध ठिकाणी ॲकॅडमी आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

लष्कराच्या रिलेशन आर्मी अंतर्गत पुण्यासह देशात ४३ ठिकाणी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार होती. या परीक्षेत देशभरातील ४० हजार उमेदवार बसले होते.
मात्र, या परिक्षेची प्रश्‍नपत्रिका पुण्यात फुटली असल्याची माहिती लष्करी गुप्तचर (एमआय) विभागाने पुणे पोलिसांना दिली होती.
त्यानुसार ही कारवाई करण्यात आली होती.

आरोपींनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता.
त्यास विशेष सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल (Special Public Prosecutor Premkumar Agarwal) यांनी विरोध केला.
सर्व आरोपींनी संगनमत करून, कट रचून लेफ्टनंट कर्नल भगत प्रितसिंग बेदी याच्याद्वारे परिक्षेचा पेपर फोडून ते एकमेकांना व्हॉटसअपद्वारे व उमेदरावांना पाठविला आहे.
फोडलेला पेपर आणि परिक्षेचा पेपर एकमेकांशी जुळविल्याबाबत लष्कराचा अभिप्राय अजून मिळालेला नाही. सर्व आरोपींचे मोबाईल मधील व्हाटॲपचा डेटा प्राप्त मिळविण्यासाठी व्हॉटसॲपच्या अमेरिकेतील मुख्यालयात पत्रव्यवहाक केला आहे.
त्याचा अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे आरोपींचा जामीन फेटाळण्यात यावा,
असा युक्तिवाद ॲड. अगरवाल यांनी केला.

 

Web Title : Army Recruitment Scam | Eight people, including two majors, were denied bail in the Army Recruitment Scam case; Learn the case

 

हे देखील वाचा :

Modi Government Schemes | 8वी पासपासून 12वी मधून शिक्षण सोडलेल्यांसाठी उपयोगी आहेत मोदी सरकारच्या ‘या’ योजना, राहणार नाही बेरोजगार; जाणून घ्या

Changes in Auto Insurance | ऑटो इन्श्युरन्समध्ये मोठा बदल ! नवीन गाडी खरेदी केल्यास ‘बंपर टू बंपर’ विमा (पूर्ण इन्श्यूरन्स) झाला अनिवार्य

Nagpur Crime | दोस्त दोस्त ना रहा ! रोज दारूसाठी तगादा लावणाऱ्या मित्राचा मित्रानेच काढला काटा

 

Related Posts