IMPIMP

Pune News | पुण्यात बेकायदेशीररित्या 830 प्रकरणांची दस्तनोंदणी; 2 अधिकारी तडकाफडकी निलंबीत

by nagesh
Pune Crime | finally suspended that teacher bhigwan Indapur taluka of pune crime news

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)– पुणे (Pune News) शहरात २४ हून अधिक दुय्यम निबंधक कार्यालय आहेत. या कार्यालयांमध्ये दस्त नोंदणी योग्यरीत्या पार पाडली जाते किंवा नाही याची पाहणी राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱयांनी केली त्यावेळी, हवेली १४ (भोसरी) दस्त नोंदणी कार्यालयात बेकायदेशीर ८३० दस्तांची नोंदणी केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, या प्रकरणी दोन अधिकार्‍यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

‘महारेरा’चा नोंदणी क्रमांक नसलेले १९५ तर तुकडाबंदीचे आदेश मोडून ६३५ अशा ८३० दस्तांची नोंदणी
केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी हवेली १४ (भोसरी) दस्त नोंदणी कार्यालयातील दुय्यम
निबंधक आणि सह दुय्यम निबंधक यांना निलंबित करण्यात आले आहे. अधिकाऱयांनी केलेल्या तपासणीत
एका प्रकरणात वर्गीकरण चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे सरकारचे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे ही
आढळून आले आहे. एकाच कार्यालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन करून दस्त नोंदणी
केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

 

 

२०१६ मध्ये राज्य सरकारने महारेराची स्थापना केली. ५०० चौरस मीटरच्या आतील अथवा आठ
सदनिकांच्या आतील प्रकल्पांना तरतुदीनुसार महारेराच्या प्रमाणपत्र नोंदणीतून वगळले आहे. परंतु
त्यावरील प्रकल्पाला महारेराकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे.अशा प्रकल्पातील सदनिकांची विक्री करताना महारेराच्या नोंदणी क्रमांकाचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

असे असतानाही हवेली १४ दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दुय्यम निबंधकांनी जाणीवपूर्वक नियमांकडे दुर्लक्ष करून १९५ दस्तांची नोंदणी केल्याचे समोर आले आहे. १० गुंठ्यांच्या आतील ६३५  दस्तांची नोंदणी केली आहे त्यामुळे तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी या कार्यालयातील दुय्यम निबंधक एल. ए. भोसले यांना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत.

 

 

या संदर्भात बोलताना नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर म्हणाले, दुय्यम निबंधकाला महारेरा आणि
तुकडाबंदी संदर्भातील आदेशाचे उल्लंघन करून दस्त नोंदणी केल्याप्रकरणी निलंबित केले आहे, तर
खासगी व्यक्तीच्या माध्यमातून दस्तनोंदणीचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यामुळे तेथील दुय्यम निबंधकालाही निलंबित केले.

 

 

खासगी व्यक्तींच्या हातात कारभार

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हवेली २२ (एरंडवणा) या कार्यालयालाही भेट दिली. तपासणीत या कार्यालयात अनेक धक्कादायक प्रकार आढळून आले आहेत. तपासणीवेळी  दुय्यम निबंधक कार्यालयात वेळेवर हजर न होणे, कार्यालयात खासगी व्यक्तींच्या हातात कारभार देणे, दस्तनोंदणी सुरू करण्यासाठीचा ओटीपी खासगी व्यक्तीला देणे, दस्तांचे स्कॅनिंग न करणे असे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सह दुय्यम निबंधक ए. के. नंदकर यांना देखील नोंदणी महानिरीक्षकांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहे.

 

Web Title : pune news 830 cases of illegal registration registered in pune two officers suspended revenue department

 

हे देखील वाचा :

Model Capris Boret | ‘पतीला ‘सेक्स’साठी कधीही देऊ नका नकार’, अमेरिकन मॉडलच्या वक्तव्यावर वाद

Pune Corporation | भाजपच्या मागणीला ‘कात्रज’ चा घाट ! 23 गावांच्या विकास आराखड्यावर शहरातील लोकप्रतिनिधींनी सूचना कराव्यात – अजित पवार

IT Company | दिग्गज IT कंपनी देईल 1 लाख लोकांना नोकरी, उत्पन्नात झाली 41.8 टक्केची वाढ

 

Related Posts