IMPIMP

Pune News | सोमवार, मंगळवार पेठेचा चेहरा मोहरा बदलणार ! पुणे महापालिकेतील सभागृह नेते बिडकर यांची ग्वाही

by nagesh
Pune News | somwar peth and mangalwar pethe's face will change! Testimony of House Leader Bidkar of Pune Municipal Corporation

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune News | शहरातील मध्यवस्तीचा भाग असलेल्या सोमवार पेठ, मंगळवार पेठेत आवश्यक त्या सोयी सुविधा देत या भागाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. अशी ग्वाही महनगरपालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar, Leader of the House, Pune Municipal Corporation) यांनी शुक्रवारी दिली. या भागात केला जाणारा ‘स्मार्ट प्रभाग – स्मार्ट रास्ता’ हा त्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी (Pune News) सांगितले.

 

सभागृह नेते बिडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी सोमवार पेठ, मंगळवार पेठ परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील कांबळे यांच्यासह पालिकेलेचे नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी या भागातील नागरिक विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भागातील नागरिकाच्या सोयीसाठी या परिसरात आवश्यक असलेली पावसाळी गटारांची लाईन टाकणे, ड्रेनेज लाईन टाकणे तसेच खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे ही कामे प्रामुख्याने केली जाणार आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

मध्यवस्तीचा भाग असलेल्या सोमवार पेठ, मंगळवार पेठेतील रस्ते अरुंद आहेत.
या भागातून अनेक ठिकाणी ये जा करणे सोयीचे असल्याने मोठ्या प्रमाणात वाहन चालक या रस्त्यांचा वापर करतात.
हा भाग वर्दळीचा असल्याने येथे नवीन रस्ते बांधले जात नाही. या रस्त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीची कामे केवळ केली जातात.
शहराची उपनगरे असलेल्या भागातील प्रशस्त आणि नागरिकांना चालण्यासाठी उपयुक्त असलेले रस्ते पाहिल्यानंतर असे रस्ते या भागात का होऊ शकत नाही.
असा प्रश्न विचारला जातो.
शहरातील इतर भागांमध्ये असलेले रस्ते या ठिकाणी व्हावेत यासाठी कटिबद्ध असल्याचे सभागृह नेते बिडकर यांनी सांगितले.
या प्रभागातील नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असून पुढील काही महिन्यांमध्ये या भागात
नवीन बदल पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी (Pune News) यावेळी दिली.

सभागृह नेते बिडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत नागरिकांना आरोग्य कार्डचे वाटप देखील करण्यात आले.
तसेच विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण कार्यक्रम देखील यावेळी करण्यात आला.
बिडकर यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती.
शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, शासकीय अधिकारी यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या कामाचे कौतुक केले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पुणेकरांनी साडेचार वर्षांपूर्वी ज्या विश्वासाने भारतीय जनता पक्षाला (भाजप) महानगरपालिकेत एकहाती सत्ता दिली.
त्यांचा विश्वास सार्थ करताना सत्ताधारी म्हणून भाजपने शहरात अनेक महत्वाचे प्रकल्प मार्गी लावले आहेत.
सोमवार, मंगळवार पेठेसह प्रत्येक प्रभागातील रस्ता स्मार्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

 

– गणेश बिडकर, सभागृह नेते, पुणे महानगरपालिका (Ganesh Bidkar, Leader of the House, Pune Municipal Corporation)

 

Web Title : Pune News | somwar peth and mangalwar pethe’s face will change! Testimony of House Leader Bidkar of Pune Municipal Corporation

 

हे देखील वाचा :

Hasan Mushrif | हसन मुश्रीफ पालकमंत्रीपद सोडणार? जाणून घ्या कारण

Jayant Patil | ‘नव्या पिढीच्या विचारांशी समन्वय साधायला हवा, तेव्हाच…

Ajit Pawar On Pune Metro | ‘शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम दिवाळीनंतर सुरू करणार’

7th Pay Commission | ‘या’ अधिकार्‍यांना दिवाळीपूर्वी लागली लॉटरी, पगारात मिळाली 2030 रुपयांची विशेष ‘वाढ’; जाणून घ्या

 

Related Posts