IMPIMP

Pune : पीएमपी संचालक राजीनामा नाट्याचा पुढील अंक ‘पोलिस ठाण्यात’ ! भाजपच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘हल्ला’

by omkar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –पीएमपीच्या संचालक (Director of PMP) पदावरुन भाजप मध्ये सुरू झालेल्या अंतर्गत वादाचे खापर थेट पीएमपीएमएल संचालक कार्यलयावर फुटले आहे. दोन दिवसांपुर्वी झालेल्या पीएमपीच्या संचालक ( Director of PMP ) मंडळाच्या बैठकीचे ‘इतिवृत्त’ मिळवण्याच्या नाट्यमय घडामोडिंचा वाद थेट ‘ पोलीस ठाण्यात ‘ पोहोचला आहे. ही संधी साधत राष्ट्रवादी काँग्रेसने थेट ‘ भाजप ‘ वर हल्ला चढवत महापौरांचा निषेध केला आहे.

Gold Silver Price Today : 2 दिवसांमध्ये सोनं 1000 रूपयांनी ‘स्वस्त’, चांदी देखील घसरली; जाणून घ्या आजचे दर

पीएमपीचे संचालक ( Director of PMP ) शंकर पवार यांचा राजीनामा मंग़ळवारी संचालक मंडळाच्या बैठकित तांत्रिक कारणांमुळे मंजुर झाला नाही.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनीच राजीनामा भाजप शहर अध्यक्ष्यांच्या नावाने असल्याने कंपनी कायद्यानुसार तो मंजूर करता येणार नसल्याचे बैठकीत सांगितल्याने राजीनामा मंजूर होऊ शकला नाही.
अशी तक्रार सभागृह नेते गणेश बिडकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. त्यावरून मोहोळ आणि बिडकर यांच्यात वादावादी झाली होती.


अखेर बैठकितील इतिवृत्त काढण्यासाठी शुक्रवारी मोहोळ हे पीएमपीच्या कार्यालयात गेले होते.
मात्र, त्याठिकाणी घडलेल्या प्रकारांवरून वेगवेगळे आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
त्यावरून पीएमपीने महापौरांसह गेलेल्या कर्मचार्‍यांनी कार्यालयात येऊन .
संगणकाशी छेडछाड केल्याप्रकरणी दोन जणांना विरोधात तक्रार केली आहे.
तर या कर्मचार्‍यांनी सुध्दा पीएमपीच्या विरोधात तक्रार केली आहे

बैठकिचे इतिवृत्त आणण्यासाठी मी पीएमपी (PMP) कार्यालयात गेलो होतो, मात्र, येथील कर्मचार्‍यांनी बैठकिचे इतिवृत्त मुख्य व्यवस्थापकिय अध्यक्ष व संचालक राजेंद्र जगताप यांनी त्यांच्या घरी नेले आहेत, असे उत्तर दिले, त्यावर जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी इतिवृत्त देतो, दोन कर्मचार्‍यांना थांबवा असे सांगितले. त्यानुसार आपले दोन कर्मचारी थांबले होते. मात्र, त्यानंतर थेट याठिकाणी पोलिस आले आणि पालिकेच्या कर्मचार्‍यांना ताब्यात घेतले अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

यासंदर्भात पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप म्हणाले, की
मी व्यक्तिगत कारणास्तव बाहेरगावी आहे.
माझ्या कार्यालयात प्रवेशास मनाई केल्यानंतरही दोन व्यक्ती कार्यालयातील संगणकावर छेडछाड करत असल्याचे सुरक्षा रक्षकांनी मला कळविले.
त्यानुसार मी त्यांना पोलिसांमध्ये तक्रार करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
उद्या मी पुण्यात आल्यानंतर सविस्तर माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.

दरम्यान महापौर मुरलीधर मोहोळ आणि इतर पदाधिकार्‍यांनी ‘पीएमपी’चे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्या कार्यालयात घुसून संगणकात छेडछाड केली.
तसेच ‘पीएमपी’च्या कर्मचार्‍यांना महापौर व इतरांकडून कार्यालयाची तोडफोड करण्याची धमकीही दिली. पुण्यनगरीचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांची ही कृती निश्चितच निषेधार्ह आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

Also Read:- 

कल्याणमध्ये एका घरात आढळली शेकडो कोरी मतदान ओळखपत्र, प्रचंड खळबळ

मोफत रेशन घेण्यासाठी घरबसल्या बनवा रेशन कार्ड; जाणून घ्या ऑनलाइन प्रोसेस

Monsoon 2021 : 2 दिवसांत महाराष्ट्रात धडकणार ‘मान्सून’ !

Coronavirus : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून कसे रहायचे सुरक्षित? आतापासून सुरू करा ‘ही’ 8 कामे

Devendra Fadnavis : ‘प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु, कालचा गोंधळ जरा जास्तच झाला’ (व्हिडीओ)

राजीव सातव यांच्या जागेवर आता कोण? ‘राहुल-प्रियांका’ यांच्यात नावावरून मतभेद

नारायण राणेंच्या टीकेनंतर खा. संभाजीराजेंचं सूचक ट्वीट, म्हणाले…

Devendra Fadnavis : ‘राज्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि 5 सुपर मुख्यमंत्री’ (व्हिडीओ)

2 महिन्यांपेक्षा अधिक जास्तीचं भाडे घेता येणार नाही, नव्या घरभाडे कायद्यामध्ये आता घरमालकाचा समावेश 

 

Related Posts