IMPIMP

Pune Railway Police | प्रवाशांचे मोबाईल चोरणारा सराईत चोर लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात, 4 गुन्हे उघडकीस

by nagesh
pune railway police | mobile thief arrested by pune railway police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या (mobile thief arrest) सराईत चोरट्याच्या पुणे लोहमार्ग पोलिसांनी (Pune Railway Police) मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीकडून चार गुन्हे अघडकीस आले असून त्याच्याकडून विविध कंपन्यांचे 87 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल पुणे लोहमार्ग पोलिसांनी (Pune Railway Police) जप्त केले आहेत. राहुल उर्फ बंडु शामसुंदर मोहाळे (वय-26 रा. चंदननगर, मुळ रा. मनोरा, वाशिम) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पुणे शहर (Pune city) आणि रेल्वे स्थानक परिसरात (railway station area) मोबाईल
चोरणारा सराईत चोरटा राहुल मोहोळ मोबाईल विक्रीसाठी पुणे रेल्वे स्टेशनच्या हद्दीत येणार
असल्याची माहिती पुणे लोहमार्ग पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार, पुणे लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चार गुन्हे केल्याची कबुली दिली.
त्याच्याकडून दुचाकी आणि चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील (Railway Superintendent of Police Sadanand Vaise-Patil), अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार (Additional Superintendent of Police Kavita Nerkar-Pawar), उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत क्षिरसागर (Sub-Divisional Police Officer Shrikant Kshirsagar),
पोलीस निरीक्षक मौला सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या
सहायक पोलीस निरीक्षक पालवी काळे, भिमा हगवणे, प्रशांत डोईफोडे, अतुल भुजबळ, विकास केंद्रे,
प्रशांत पानसरे यांच्या पथकाने केली.

 

Web Title : pune railway police | mobile thief arrested by pune railway police

 

हे देखील वाचा :

Beed Crime | पैशांसाठी मुलानेच जन्मदात्या वडिलांची केली हत्या

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 399 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

PSI Suspended | पुण्यातील हॉटेलमध्ये पैसे मागणे पडले महागात, पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित

 

Related Posts