IMPIMP

Pune Weather Update | पुणे झाले ‘हॉट सिटी’ ! पुण्यात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद, पुढील दोन दिवस उष्णतेची लाट

by sachinsitapure

पुणे : – Pune Weather Update मागील काही दिवसांपासून पुण्याच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. उकाड्यामुळे पुणेकर चांगलेच हैराण झाले आहे. राज्यातील सर्वाधिक तापमान पुण्यात झाले असून तापमानाच्या बाबतीत पुण्याने चंद्रपुरला देखील मागे टाकले आहे. पुण्यातील तळेगाव ढमढेरे परिसरात राज्यातील उच्चांकी 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय सोलापूर मध्येही 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानामुळे ऐरवी गजबजलेल्या पुण्यातील रस्त्यांवर दुपारच्या सुमारास शुकशुकाट दिसत आहे.

पुणे शहर आणि उपनगर भागात देखील तापमान 40 अशं सेल्सिअसच्या वर गेले आहे. यामध्ये शिवाजीनगर, मगरपट्टा, पाषाण भागांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे 43.9 अंश सेल्सिअस तर मगरपट्टा येथे 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वडगाव शेरी, कोरेगाव पार्क, एनडीए, हडपसर या ठिकाणी राज्यातील सर्वात कमी किमीन तापमानाची नोंद झाली आहे. एककीकडे पुण्यात तापमानाचा पारा वाढत असताना या ठिकाणी 22.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

दोन दिवस उष्णतेची लाट

पुण्यात तापमानामुळे पुणेकरांच्या जीवाची लाहीलाही होत असताना पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळावे. डिहायड्रेड होऊ नये यासाठी सतत पाणी प्यावे, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. दोन दिवसानंतर वातावरणात बदल होऊन तापमानात घट होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

पुण्यातील वेगवेगळ्या भागातील तापमान

ढमढेरे : 44.0 अंश सेल्सिअस
शिरूर : 43.9 अंश सेल्सिअस
मगरपट्टा : 43.0 अंश सेल्सिअस
वडगावशेरी : 42.9 अंश सेल्सिअस
कोरेगाव पार्क : 42.9 अंश सेल्सिअस
पुरंदर : 42.7 अंश सेल्सिअस
राजगुरुनगर : 42.5 अंश सेल्सिअस
इंदापूर : 42.5 अंश सेल्सिअस
हडपसर : 42.1 अंश सेल्सिअस
चिंचवड : 41.7 अंश सेल्सिअस
शिवाजीनगर : 41.7 अंश सेल्सिअस
बारामती : 41.1 अंश सेल्सिअस

आज ‘या’ भागात उष्णतेची लाट

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्याच्या पश्चिम आणि मध्य भागात सर्वाधिक उच्च तापमानाची नोंद झाली आहे. आज बुधवार (दि.1 मे) सलग तिसऱ्या दिवशी रायगड, मुंबई उपनगर आणि ठाण्यासह कोकणात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Solapur Lok Sabha | राम सातपुतेंना ‘उपरा’ म्हणत प्रणिती शिंदेंचे भाजपवर टीकास्त्र

Related Posts