IMPIMP

Solapur Lok Sabha | राम सातपुतेंना ‘उपरा’ म्हणत प्रणिती शिंदेंचे भाजपवर टीकास्त्र

by sachinsitapure

सोलापूर :  – Solapur Lok Sabha | सोलापुरात यापूर्वी सलग दोनवेळा जनतेने निवडून दिलेले दोन्ही खासदार निष्क्रिय आणि दहा वर्षे नापासच झाले आहेत. आता तिसऱ्यांदा भाजपने (BJP) उभा केलेला उपरा उमेदवारही निवडणुकीतच नापास होईल, अशा शब्दात सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) आणि भाजपवर सडकून टीका केली आहे.

अक्कलकोट (Akkalkot) व दक्षिण सोलापूर (South Solapur) तालुक्यांमध्ये विविध गावांमध्ये जाऊन प्रणिती शिंदे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपच्या यापूर्वीच्या दोन्ही खासदारांच्या निष्क्रियतेवर टीकात्मक भाष्य केले. त्या म्हणाल्या, दोन्ही खासदार दहा वर्षापैकी एकाही वर्षात चांगल्या कामगिरीच्या माध्यमातून उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. सर्व दहा वर्ष नापासच झाले आहेत. त्यांची शिक्षा मात्र सोलापूरकरांना मिळाली आहे. ही चुकीची पुनरावृत्ती आता तिसऱ्यांदा होणार नाही, असा विश्वास प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात (Solapur City North Assembly Constituency) मोठ्या लोकसंख्येच्या आणि भाजपशी बांधिल असलेल्या वीरशैव लिंगायत समाजाशी संपर्क वाढवला आहे. बाळीवेशीत मल्लीकार्जुन मंदिराजवळील प्रसिद्ध सिद्धेश्वर तालमीत आयोजित बैठकीत शिंदे यांनी लिंगायत समाजाला (Lingayat Community) मदतीची हाक दिली आहे.

Rape Case Pune | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

Related Posts