IMPIMP

Raj Thackeray Sabha For Murlidhar Mohol | राज ठाकरे यांची उद्या मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पुण्यात जाहीर प्रचारसभा

by sachinsitapure

पुणे : Raj Thackeray Sabha For Murlidhar Mohol | राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर त्यांची पहिली सभा भाजपा नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासाठी कोकणात झाली होती. आता दुसरी सभा महायुतीचे भाजपाचे उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पुण्यात होत आहे (Raj Thackeray Sabha In Pune). ही सभा उद्या १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पुण्यातील सारसबाग (Sarasbaug) परिसरात उद्या सायंकाळी ६ वाजता होणार आहे. सभेच्या नियोजनासाठी मनसे कार्यालयात भाजप आणि मनसेच्या नेत्यांची (MNS Leader) महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांच्या सभेचे नियोजन करण्यात आले.

पुणेकर मतदार विशेषतः युवक राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यास उत्सुक असतो. मनसेला मानणारा मोठा मतदार पुणे लोकसभा मतदारसंघात (Pune Lok Sabha) आहे. मनसेचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोहोळ यांच्या प्रचारात एकदिलाने उतरले आहेत.

राज ठाकरे यांची सभा यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत. सभेला चांगली गर्दी होईल असा विश्वास आहे. सभास्थानी प्रत्यक्ष जाऊन पाहाणी केली आणि आढावा घेतला. वाहतुकीची कोंडी (Traffic Jam In Pune) होणार नाही यासाठी प्रयत्न करीत आहोत, अशी माहितीमनसेच्या नेत्यांनी दिली.

Ravindra Dhangekar | वानवडीतील सोसायट्या व ट्रॅफिक प्रश्नांसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करणार – रवींद्र धंगेकर

Related Posts