IMPIMP

Ravindra Dhangekar | काँग्रेसमुळेच पुण्याला वैभवशाली स्वरूप – रवींद्र धंगेकर

by sachinsitapure

पुणे : Ravindra Dhangekar | आज पुण्याची ओळख उद्योग नगरी, आयटी नगरी, क्रीडा नगरी, ऑटोमोबाईल हब, बायोटेक्नॉलॉजी हब, उद्यान नगरी, महोत्सव नगरी, अशी बनली आहे ही सगळी ओळख पुण्याला काँग्रेस राजवटीतून आणि काँग्रेसच्या नेतृत्वातूनच मिळाली आहे असे प्रतिपादन महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व इंडिया आघाडी (India Aghadi) काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha) उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केले.

प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात धंगेकर यांनी म्हटले आहे की पुण्याच्या लोकसभेच्या यापूर्वीच्या सर्वच काँग्रेस खासदारांनी आपापल्या परीने शहराच्या विकासात आणि वैभवात भर घालण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्याची फलनिष्पत्ती पुणे शहर भरभराटीला येण्यात झाली आहे. राजीव गांधी आयटी पार्क ही सुद्धा काँग्रेसच्या राजवटीचीच देन आहे. त्यातून हजारो युवकांना चांगल्या प्रकारे पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या. या आयटी पार्क मधून असंख्य लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळाला. केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वाच्या संस्था पुण्यामध्ये उभारण्यात आल्या असून त्याचेही योगदान काँग्रेस राजवटीचेच आहे. मी देखल पुण्याचा खासदार म्हणून शहराच्या लौकिकात आणि वैभवात भर घालण्याचा कोसोशीचा प्रयत्न करेन आणि पुण्याचे हे स्वरूप अधिक विस्तृत करेन अशी ग्वाही या निमित्ताने आपण देत आहोत असेही धंगेकर यांनी या निवेदनात नमूद केले आहे. पुण्याला काकासाहेब गाडगीळ, टिळक बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, जयंतराव टिळक केशवराव जेधे आदी अनेक दिग्गजांचे नेतृत्व लाभले. सुरेश कलमाडी यांनीही काँग्रेसचे खासदार म्हणून पुण्याचा चौफेर विकास करत शहराला क्रीडा नगरीचे स्वरूप दिले. हे सगळे काँग्रेसचे योगदान न विसरता येणारे आहे याची जाणीव पुणेकरांना असल्याने पुणेकर नागरिक यंदा काँग्रेसच्याच पाठीशी उभे राहतील असा विश्वास धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.

धंगेकर म्हणाले की, गेल्या १० वर्षात पुण्याच्या विकासाला कोणताही मोठा निधी भाजपच्या खासदारांनी आणला नाही. तसेच विकास प्रकल्प देखील वेळेत पूर्ण होऊ शकलेले नाहीत त्यामुळेच पुणेकरांनी मला खासदारकीची संधी द्यावी मी पुण्याच्या विकासाला दिशा आणि गती नक्की देईन असा विश्वास त्यांनी पुणेकरांना दिला.

Related Posts