IMPIMP

Ravindra Dhangekar | महाराष्ट्रीयन उत्तर भारतीय एकता मंच तर्फे रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठींबा

by sachinsitapure

पुणे : Ravindra Dhangekar | पुण्याच्या उत्तर भारतीय नागरिकांनी विशाल मेळावा आयोजित करून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व इंडिया आघाडीचे (India Aghadi) काँग्रेस पक्षाचे उमेदवार (Congress Candidate) आ. रवींद्र धंगेकर यांना पाठींबा जाहीर केला. महर्षी नगर परिसरातील अतिथी वेज रेस्टॉरंट येथे झालेल्या या मेल्याव्याचे आयोजन महाराष्ट्रीयन उत्तर भारतीय एकता मंच तर्फे करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पाटोले (Nana Patole) या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पुण्यात स्थायीक झाले सर्व उत्तर भारतीय, उत्तरांचल, बिहारी लोक त्यात ब्राह्मण, ठाकूर, यादव ,मुस्लिम, ख्रिस्ती यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नाना भाऊ पटोले ह्यांनी मार्गदर्शन केले. नानाभाऊ पटोले ह्यांचे स्वागत भगवान भोलेनाथ जींची मूर्ति देवुन केले गेले, अध्यक्ष नाना भाऊ ह्यांनी आपल्या भाषणात मोदींची खोटी आश्वासने, भाजपचा गुंडाराज, महागाई, स्त्री सुरक्षा, बेरोजगारी ,GST या विषयांवर बोलून मोदी सरकार वर टीकेचे आसूड ओढले. त्यांनतर उत्तर भारतीय नागरिकांनी पुण्याच्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर ह्यांना उत्तर भारतीय नागरिकांचा जाहीर पाठिंबा जाहीर केला. ह्या वेळी उत्तर भारतीयांनी नाना भाऊ ह्यांना पुणे वाराणसी जाण्यासाठी रोज एका रेल्वेची ची मागणी केली. सरकार आल्यावर आम्हास ही गाडी रोज पाहिजे ही मागणी भाऊंनी मान्य केली. ह्यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे महासचिव आशिष दुवा, माजी आमदार उल्हास पवार, काँग्रेस निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशी, सरचिटणीस ड अभय छाजेड, दिलीप गोसल, वीरेंद्र किराड, सुजाता शेट्टी, बळीराम डोळे, रफिक शेख, अक्षय जैन, पूनमीत तिवारी, यामिनी खवले, रीता कांदा, उपस्थित होते.

तसेच उत्तर भारतीय समाजाचे पंडित अरुण शास्त्री जी, रवींद्र दुबे, ठाकूर धर्मेंद्र सिंह, पंडित मिश्रा. ब्रिजेश तिवारी, ग्रीजेश गिरी, धर्मेंद्र तिवारी. राजू भाई ओझा. अंकुर पाण्डे, वृंदा भंडारी, पूर्णिमा लूनावत, यक्ष झा, मुन्ना यादव, साहनी , सीमा सिंग, हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता स्नेह भोजनाने झाली.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्रीयन उत्तर भारतीय एकता मंच च्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती संगीता तिवारी आणि माजी पुणे शहर अध्यक्ष रवींद्र दुबे ह्यांनी केले होते. हर हर महादेव , जय हो गंगा माई की अशा जयकार करत मीटिंग चा समारोप झाला.

संगीता तिवारी ह्यांनी आपल्या भाषणात करोना मध्ये उत्तर भारतीय किती वाइट अवस्थेत गावा कडे गेले हे 4 ओळीत सांगितले

खाली पेट, नंगे पाव।
कैसे पहुंचा अपने गांव।
हम सब याद रखेंगे।
हम सब याद रखेंगे।
पाई पाई तेरे जुल्मों का।
हम हिसाब रखेंगे।
हम सब याद रखेंगे।
13 तारीख को अब हम तुझको हिसाब दे देंगे।
बटन दबाके हम पंजे का।
तेरा हिसाब कर देंगे।
हम सब याद रखेंगे

ही कविता त्यांनी सदर केली. तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून मोठा प्रतिसाद दिला.

Related Posts