IMPIMP

शिरूर महसुल अधिकाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा करणारा वाळु तस्कर अखेर LCB कडून अटकेत; 7 महिन्यापासून होता फरार

by omkar
Shirur

शिक्रापुर : सरकारसत्ता ऑनलाइन – Shirur – अवैध वाळू चा व्यापार करणाऱ्या ट्रक वर कारवाई केल्यानंतर ट्रक मधील वाळू खाली करून महसूल पथकास दमदाटी करून पळून गेलेल्या व्यक्तीस सात महिन्यानंतर पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत सविस्तर
वृत्त  असे की, दि. 30/10/2020 रोजी पहाटे 05 :00 वा.सुमारास शिरूर (Shirur) तहसिल कार्यालयातील महसुल खात्याचे अधिकारी व पथकाने अवैध गौण खनिज उत्खनन व चोरी यावर कारवाई करत असताना कारेगाव ता. शिरूर (Shirur) हद्दीत फलके मळा येथे हायवा ट्रक नं.एम. एच 12 क्यु. डब्ल्यु. 9995  हा पुणे नगर हायवे रोडने पुणे बाजुकडे जात असताना पथकाने हायवा ट्रक थांबवून पाहणी केली असता, त्यामध्ये वाळु असल्याचे पथकाला आढळून आले होते.

PM मोदींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना !

Shirur-crime

चालकास पावतीची मागणी महसुल खात्याचे पथकाने केली असता, चालकाजवळ पावती मिळून आली नाही.
त्यावेळी महसुल खात्याच्या पथकाने चालकास हायवा ट्रक रांजणगाव पोलीस स्टेशन येथे घेण्यास सांगितला,
महसूल खात्याचे पथक हायवा ट्रक रांजणगाव पोलीस स्टेशन च्या दिशेने घेवून जाताना आरोपी धीरज पाचर्णे हा त्याच्या कडील स्विफ्ट कार नं. (एम. एच 12 क्यु एम 0012) मधून
पाठीमागून आला व त्याने हायवा ट्रक थांबवून चालकास खाली उतरवून हायवा ट्रक मधील वाळू रोडचे कडेला हायवाचे हायड्रोलिकने खाली केली.
आणि महसुल खात्याच्या पथकाने शासकीय कामात अडथळा आणून त्यांना दमदाटी करून चालकास घेवून निघुन गेला.
यानंतर हायवा ट्रक महसूल खात्याच्या पथकाने रांजणगाव पोलीस स्टेशन येथे आणून लावला.
याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यातील आरोपी धीरज जगन्नाथ पाचर्णे (वय 30  वर्षे रा. तर्डोबाचीवाडी, शिरूर ता. शिरूर) हा गुन्हा केल्यानंतर सुमारे सात महिन्यापासून फरार होता.
सदरचा आरोपी हा शिरूर बायपास परीसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकास मिळाली होती.
त्यानुसार तपास पथकाने सापळा रचुन आरोपीस ताब्यात घेतले .

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे सपोनि.
सचिन काळे, जनार्दन शेळके,पो.ना अजित भुजबळ,
पो.ना राजु मोमीण, पो.ना. मंगेश थिगळे यांनी केली आहे.

Also Read:- 

8 जून राशीफळ : ‘या’ 4 राशींनी राहावे सावध, धनहानीचे संकेत, इतरांसाठी असा आहे मंगळवार

PM मोदींची मोठी घोषणा ! केंद्र सरकार 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण मोफत करणार

हसन मुश्रीफांचा गंभीर आरोप, म्हणाले- मोदी सरकारने तंबी दिल्याने अदर पुनावाला लंडनला जाऊन बसले

Sachin Vaze | नालेसफाई करणार्‍या कंत्राटदाराकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी वाझेवर होती, भाजपकडून आरोप

Pune Crime News | वाहन आणि मोबाईल चोरी करणार्‍या सराईतांना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकानं पकडलं, 7 गुन्हयांची उकल

तुमच्या स्मार्टफोनवर ‘गुगल’ कोणत्या गोष्टींना करत आहे रेकॉर्ड, मिनिटात ‘या’ पद्धतीने जाणून घ्या

Web Title- Sand smuggler obstructing government work of Shirur revenue officers finally arrested by LCB; Had been absconding for 7 months

Related Posts