IMPIMP

Sharad Pawar | NDA चे खासदार नाराज? पुन्हा लोकसभेची निवडणूक लागणार? शरद पवारांचे मोठे वक्तव्य

by sachinsitapure

पुणे: Sharad Pawar | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Lok Sabha Election Results 2024) एनडीएच्या नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. ४०० पार चा नारा देणाऱ्या भाजपाला ३०० जागांपर्यंतही पोहोचता आले नाही. अनेक लोकसभा मतदारसंघात राजकीय तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. संसदीय अधिवेशनही सुरु आहे.

अशातच लोकसभेची निवडणूक पुन्हा होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. एनडीए खासदारांमध्ये नाराजी असल्याच्या वृत्तांवर प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांना विचारले असता, ” असे काही माझ्या ऐकण्यात नाही. तसे कुणी आमच्याशी बोललेलेही नाही. संसद अधिवेशन खऱ्या अर्थाने उद्यापासून सुरू होत आहे. पहिले अधिवेशन आहे, आताच काही कळणार नाही. दुसऱ्या सेशनपर्यंत याचा अंदाज येईल. कुठल्याही खासदाराला पुन्हा निवडणूक नकोय. निवडणुका कव्हर करायला तुम्हाला किती त्रास होतो तेवढाच त्रास उन्हाचा पावसाचा आम्हाला देखील होतो. त्यामुळे आता कुणालाच निवडणुका नको आहेत.”, असे पवार म्हणाले.

महाराष्ट्र हे दोन नंबरचे कर्जबाजारी राज्य व राज्याच्या अर्थसंकल्पावर देखील पवार यांनी प्रतिक्रिया दिली. तुमच्याकडे खिशात काय? हे न तपासता तुम्ही बाजारात जाऊन खरेदी करायला गेलात तर काय अवस्था होते हे मी सांगायची गरज नाही. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला त्याच्यापासून धसका घेतला आहे. आणि म्हणून अशाप्रकारची आखणी केली आहे. तातडीने या सगळ्या गोष्टी आम्ही देणार असे जाहीर केले. आता दिवस फार राहीले नाहीत. आता थोड्याच दिवसात वस्तुस्थिती कळेल, असेही पवार म्हणाले.

Related Posts