IMPIMP

Sharad Pawar On Dattatray Bharne | ‘अरे मामा जरा जपून, लक्षात ठेवा, सरळ करायला वेळ लागणार नाही’, इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

by sachinsitapure

पुणे : – Sharad Pawar On Dattatray Bharne | लोकसभा निवडणुकीच्या (Baramati Lok Sabha) तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघात सभा आणि मेळाव्यांचा धडाका सुरु आहे. आज शरद पवार यांची इंदापुरमध्ये जाहीर सभा पार पडली (Sharad Pawar Indapur Sabha). या सभेत बोलताना शरद पवार यांनी दत्तात्रय भरणे यांच्यावर हल्लाबोल केला. अरे मामा जरा जपून, काय बोलता, कुणासाठी बोलता? हे लक्षात ठेवा. सरळ करायला वेळ लागणार नाही, असा थेट इशारा शरद पवार यांनी नाव न घेता दिला. सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत शरद पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले, माझा घसा बसला त्यामुळे सांभाळून घ्या… उन्हाळा आहे, सतत भाषणे याचा परिणाम घशावर झाला. ही निवडणूक देशाची आहे. देशाला नवीन रस्ता दाखवण्याची गरज आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. भाजपच्या हातात देशाचे राज्य आहे. संपूर्ण देशाचे राज्य दिल्यानंतर देखील ज्या प्रकारे ते निर्णय घेतात यावर देश नाराज आहे.

इंडिया आघाडी नवीन संघटन काढल्यानंतर परिस्थिती बदलत चालली आहे. देशात अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. भाजपचा पराभव आता करावा लागेल. देशात रोजगार नाही. भाजपवाले दमदाटी करत, दहशत माजवतात. या गोष्टीकडे बारकाईने पाहिले पाहिजे. आता जनतेला बदल पाहिजे असे शरद पवार म्हणाले.

दत्तात्रय भरणे यांना इशारा

इंदापूरमधील काही लोकांची आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना सांगण्यात आले की आम्ही तुमच्या शेतातील पाणी बंद करु. शेतीचे पाणी हे कोणाच्या बापाची इस्टेट नाही. मी त्यांना एवढंच सांगतो मामा जरा जपून. सरळ करायला वेळ लागणार नाही. तुझ्यासाठी काय केले नाही. दुकानात मदत पाहिजे, त्यातमदत केली. लहान कुटुंबातील लोकांना मदत करणे, पाठिंबा देणे याची गरज असते. ती भूमिका मी घेतली. मात्र, आज यांचे पाय जमिनीवर राहिले नाही. त्यांचे पाय हवेत आहेत. आज मी एवढे सांगतो की, कोणीही सत्तेचा गैरवापर करत दमदाटी करत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवणे हे काम मी एक ते दोन दिवसांत करु शकतो. पण आज त्या रस्त्याने जायचे नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

Related Posts