IMPIMP

Sharad Pawar On NDA Modi Govt | “राज्यकर्त्यांकडून चर्चेची अपेक्षा करणं चुकीचे”; नव्या फौजदारी कायद्यावरून शरद पवारांचा खोचक टोला

by sachinsitapure

पुणे: Sharad Pawar On NDA Modi Govt | देशभरात आजपासून नवे फौजदारी कायदे (New Criminal Laws) लागू करण्यात आले आहे. देशातील तीन ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे हद्दपार करून त्याजागी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवे कायदे लागू करण्यात आले आहेत. भारतीय दंड संहिता (१८६०), गुन्हेगारी प्रक्रिया संहिता (१८९८) आणि भारतीय साक्ष अधिनियम (१८७२) हे कायदे आता बदलण्यात आले आहेत.

फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायद्यात मोठे बदल करण्यात आले असून हे तिन्ही नवे कायदे आधुनिक न्याय प्रणाली स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावणार आहेत. यात शून्य एफआयआर, पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार दाखल करणे आणि एसएमएसद्वारे समन्स पाठवणे यासारख्या सुविधा राहणार आहेत.

फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी तीन विधेयके सादर करून ती मंजूर करून घेतली होती. मात्र आता १५० खासदारांना निलंबित करून हे कायदे लागू करण्यात आल्याचे विरोधकांनी म्हंटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनीही यावरून टीका केली आहे.

शरद पवार म्हणाले, “देशाच्या कायदा सुव्यवस्थेतील बदल हा देशाच्या विरोधी पक्षातील १५० खासदारांना निलंबित करून करण्यात आला ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. या बदलात चर्चा आणि सूचनांचा अभाव दिसून येतोय. यासह देशाच्या सुरक्षा यंत्रणेवर येणारा ताण अधिक ठळक होतोय. काळानुरूप बदल होणं गरजेचं असलं तरी यात पारदर्शकता आणण्यासाठी चर्चा घडवून अधिक ठोस पावलं उचलता येऊ शकली असती. मात्र एककलमी कार्यक्रम राबवण्याच्या मानसिकतेने झपाटलेल्या राज्यकर्त्यांकडून चर्चेची अपेक्षा करणं चुकीचं ठरेल,” असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.

Related Posts