IMPIMP

Sharad Pawar On Raj Thackeray | “लोकसभा निकालानं सर्वांना जमिनीवर आणलं”, राज ठाकरेंच्या विधानावर पवारांचे मोजक्याच शब्दात उत्तर…

by sachinsitapure

पुणे: Sharad Pawar On Raj Thackeray | लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मैदानात उतरले होते. केंद्रात सरकार असल्याने तसेच ठिकठिकाणी पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) सभा झाल्याने महायुती मोठे यश मिळवेल अशी शक्यता होती मात्र तसे चित्र राज्यात दिसले नाही. उलट महाविकास आघाडीचा प्रयोग पुन्हा यशस्वी झाला. मविआ ला मोठे यश मिळाले. (Maharashtra Assembly Election 2024)

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ४०० पार चा नारा भाजपाकडून देण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीत ‘४०० पार’ चा नारा देणाऱ्या भाजपला २४० जागा मिळाल्या. तर, ‘एनडीए’ ला ‘३०० पार’ ही करता आलं नाही. भाजपसह ‘एनडीए’ तील मित्रपक्षांना २९२ जागांवर समाधान मानावं लागलं. तर, ‘इंडिया’ आघाडीने भरारी घेत २३७ जागा मिळवल्या आहेत.

या निवडणूक निकालांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. “लोकसभा निकालानं सर्वांना जमिनीवर आणून ठेवलं,” असं विधान राज ठाकरेंनी केलं. या विधानावर शरद पवार यांनी मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अमेरिकेत बीएमएम च्या एकविसाव्या अधिवेशनात राज ठाकरेंची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी राज ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केले. ” उद्या कोण या पक्षातून त्या पक्षात जाईल हे माहिती नाही, येत्या काळात कोण कोणत्या पक्षात जाते, हे पाहण्यासाठी वर्षभर कळ सहन करू. पण लोकसभा निकालानं सर्वांना जमिनीवर आणून ठेवलं” असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले होते.

राज ठाकरेंच्या या विधानावर पुण्यात प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला असता ” कुणाला जागा दाखवली माहीत नाही पण आमचे पाय जमिनीवरच आहेत ” अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली.

Related Posts