IMPIMP

Sharad Pawar | शरद पवारांनी उद्याच्या मतदानासाठी बूथ केंद्रांवर लावली ‘अशी’ फिल्डींग, घरच्यांसह ‘या’ लोकांवर जबाबदारी

by sachinsitapure

पुणे : Sharad Pawar | बारामती लोकसभा मतदार संघाच्या (Baramati Lok Sabha) निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. येथे सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरूद्ध सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशी लढत होत आहे. बारामतीमधील २३ लाख ७२ हजार मतदार उद्या ७ मे रोजी आपला मतदानांचा हक्क बजावतील आणि आपल्या पसंतीचा उमेदवार निवडतील. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने लेकीसाठी ८४ वर्षांच्या वडीलांनी राजकारणातील सर्वच डाव टाकले आहेत. यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. (Baramati Lok Sabha)

दरम्यान, बारामतीसह संपूर्ण राज्यात शरद पवारांनी प्रचाराचा धुरळा उडवला होता. त्यांची प्रकृती सध्या नरम असली तरी मतदानापर्यंतची सर्व आखणी शरद पवार यांनी करून ठेवली आहे. त्यांनी बारामती मतदार संघात होत असलेल्या मतदानासाठी विशेष फिल्डींग लावली आहे. यासाठी आपल्या विश्वासू सरदारांवर वेगवेगळ्या बूथ केंद्रांची जबाबदारी दिली आहे.

बारामती लोकसभा मतदार संघातील भोर, वेल्हा, मुळशीची जबाबदारी आमदार संग्राम थोपटे यांच्याकडे दिली आहे. पुरंदरची जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार आणि संजय जगताप सांभाळणार आहेत.

इंदापूरमध्ये स्वत: रोहित पवार असणार आहेत. अजित पवार यांचे सख्ख्ये भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांचे पुत्र युगेंद्र पवार बारामतीची कामगिरी पार पाडणार आहेत. खडकवासला सचिन दोडके यांच्याकडे तर दौंड नामदेव ताकवने यांच्याकडे असणार आहे. तसेच पवार कुटुंबातील इतर सदस्यसुद्धा बूथ यंत्रणा सांभाळणार आहेत.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून उद्या ७ मे रोजी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.

२५१६ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यावेळी २३ लाख ७२ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी १३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्त केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच मतदान असल्याने ७ मे रोजी बारामती, पुणे, मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व आठवडे बाजार बंद राहणार आहेत.

Related Posts