IMPIMP

Shriniwas Pawar On Ajit Pawar | अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील – श्रीनिवास पवार

by sachinsitapure

बारामती :  – Shriniwas Pawar On Ajit Pawar | देशात 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा (Barmati Lok Sabha) निकाल जाहीर होईल, तेव्हा अजित पवार यांना त्यांच्या मिशा काढाव्या लागतील, असं अजित पवार यांचे लहान बंधू श्रीनिवास पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी शनिवारी बारामतीत झालेल्या प्रचार सभेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि त्यांच्यासोबत असलेल्या पवार कुटुंबावर शरसंधान साधले होते. सध्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रचारत दिसत असलेला एकही जण चार जूननंतर दिसणार नाही, जर एकही जण दिसला तर माझ्या मिशा काढेन, असं अजित पवार म्हणाले होते.

अजित पवार यांनी पवार कुटुंबियांवर केलेल्या टीकेला श्रीनिवीस पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार यांना 4 जूनला निकाल लागल्यानंतर मिशा काढाव्या लागतील, असे श्रीनिवास पवार म्हणाले. तसेच पवार कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे अजित पवारांची आई नाराज झाल्याचे त्यांनी सांगितले. माझा मुलगाही मला प्रिय आहे आणि दीरही तितकेच प्रिय आहेत. मला तुमच्या दोघांच्या लढाईत पडायचे नाही, असे अजितदादांच्या आईने सांगितले. या संघर्षामुळे अजित पवार यांची आई बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेली आहे. अजित पवारांनी टोकाची भूमिका घेतल्याने मी त्यांची साथ सोडल्याचे श्रीनिवास पवार यांनी सांगितले.

बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (दि.7) मतदान होणार आहे. या निवडणुकीत शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या हाय व्होल्टेज लढतीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. याठिकाणी पवार विरुद्ध पवार अशी लढत होत असून याठिकाणी शरद पवार आणि अजित पवार यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकीच्यानिमित्ताने शरद पवार यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली आहे.

शरद पवारांवर सभेचे मैदान बदलण्याची वेळ

बारामती आणि शरद पवार हे वर्षानुवर्षे अतूट असे समीकरण राहिले आहे. बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे निवडणूक कोणतीही असो शरद पवार प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीतील मिशनरी बंगल्याच्या मैदानावर सांगता सभा घेत आलेत. मात्र, यंदा मिशन बंगला परिसरातील मैदान अजित पवार यांच्या पक्षाला सभेसाठी प्रशासनाकडून देण्यात आले. त्यामुळे सुप्रिया सुळे यांची सांगता सभेसाठी बारामतीतील मोरगाव रस्त्यावरील एका मैदानाची निवड करण्याची वेळ शरद पवार गटावर आली.

Related Posts