IMPIMP

पुणेकरांसाठी Good News ! 28 मार्चपासून ‘या’ 5 शहरांसाठी सुरू होणार Non-Stop विमानसेवा

by pranjalishirish
spicejet to start non stop flights to five new cities from pune beginning march 28

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – खासगी विमान कंपनी स्पाइसजेट (SpiceJet) ही पुण्यातून 5 मोठ्या शहरांसाठी नॉनस्टॉप विमानसेवा सुरू करत आहे. 28 मार्च पासून या विमानसेवेला सुरुवात होत आहे. पुणेकरांसाठी नक्कीच ही चांगली बातमी आहे.

ज्या 5 शहरांसाठी पुण्यातून विमानसेवा सुरू होत आहे त्यात दरभंगा, दर्गापूर, ग्वाल्हेर, जबलपूर आणि वाराणसी या 5 शहरांचा समावेश आहे. कंपनीनं सांगितलं आहे की, मेट्रो आणि नॉन मेट्रोल शहरांमध्ये कनेक्टीव्हिटी वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

एक निवेदन देत कंपनीनं याबाबतची माहिती दिली आहे. कंपनी किमान 66 नवीन फ्लाईट्स सुरू करणार आहे. याशिवाय काही विशिष्ठ मार्गांसाठी अधिकच्या फ्लाईट सुरू करण्यात येतील. 28 मार्चपासून ही सेवा सुरू होईल.

स्पाइसजेटनं  SpiceJet जारी केलेल्या पत्रकात असंही म्हटलं आहे की, छोट्या शहरांमधून विमान प्रवासाच्या वाढत्या मागणीमुळं UDAN योजनेअंतर्गत स्पाइसजेट आता नाशिक, दरभंगा, दर्गापूर आणि ग्वाल्हेरला मेट्रो शहरांसोबत जोडण्यासाठी नव्या फ्लाईट्स सुरू करणार आहे. विमानाद्वारे पुण्याला दरभंगा, दुर्गापूर, ग्वाल्हेर, जबलपूर आणि वाराणसी या शहरांशी जोडणारी स्पाइसजेट ही पहिली कंपनी आहे असंही कंपनीनं म्हटलं आहे.

दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू या शहरांसाठी स्पाइसजेटनं नाशिक शहरावरून सेवा सुरू केली होती. आता कोलकाता शहरासाठीही विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे असंही कंपनीनं सांगितलं आहे.

Also Read :

महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही… मग नियुक्त्या का थांबल्या ?, स्पर्धा परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा ट्विटरवरुन सरकारला प्रश्न

सिंधीया यांच्या ज्या ‘जय विलास’ राजवाड्यात झाली चोरी, तिथं आहेत 400 खोल्या आणि 3500 KG चे झुंबर

Sachin Vaze Case : देवेंद्र फडणवीसांनी रात्री उशीरा घेतली PM मोदी अन् HM अमित शाह यांची भेट

Sachin Vaze Case : महाविकास आघाडीच्या एक-दोन मंत्र्यांची NIA कडून चौकशी होण्याची शक्यता

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी

Related Posts