IMPIMP

Supriya Sule On Mahadev Jankar | मुलीने सासरी राहु नये, म्हणणाऱ्या महादेव जानकरांना सुप्रिया सुळेंचा टोला, म्हणाल्या – ”मुलीला वडिलांच्या संपत्तीत…”

by sachinsitapure

पुणे : Supriya Sule On Mahadev Jankar | बहिणीचे लग्न झाल्यावर तिने भावाच्या घरात राहायचे नसते, आपल्या घरी जावे. भाऊ म्हणून सोन्याची साडी घेऊ, अशी टीका बारामती (Baramati Lok Sabha) तालुक्यातील डोर्लेवाडी येथे झालेल्या सभेत महादेव जानकर यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत केली होती. या टीकेला आता बारामतीच्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi Candidate) उमेदवार सुप्रिया सुळे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. मुलीला वडिलांच्या संपत्तीत पन्नास टक्के अधिकार असतो, अशी आठवण त्यांनी जानकर यांना करून दिली आहे. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकेल. पण सरकारने एक कायदा केला आहे की, राज्यातील आणि देशातील कुठल्याही मुलीला वडीलांच्या संपत्तीमध्ये पन्नास टक्के अधिकार आहे.

महाराष्ट्रातील बिघडलेल्या आर्थिक स्थितीबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, दुष्काळ, कांद्याच्या निर्यातीची समस्या, सोयाबीन, कापसाला किंमत नाही, दुधाला भाव नाही, त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, भ्रष्टाचार वाढला आहे, त्यामुळे तमाम जनता त्रस्त असल्याचे मागील काही दिवस प्रचारानिमित्त फिरताना प्रकर्षाने दिसले.

बारामतीमधील लोकसभेची लढत ही सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशी नसून मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचे महायुतीचे नेते म्हणत आहेत. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्यासाठी ही लढाई यूपीए (UPA) विरुद्ध एनडीए (NDA) अशी आहे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्याविरोधातील आहे, असे सुळे म्हणाल्या. तसेच या निवडणुकीत धनशक्तीचा वापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Related Posts