IMPIMP

Sushma Andhare On Vijay Shivtare | विजय शिवतारेंवर सुषमा अंधारेंची खोचक टीका, ”ते शिवसैनिक नाही तर भ्याड सैनिक, कारण…”

by sachinsitapure

पुणे : Sushma Andhare On Vijay Shivtare | तारे आता जमीन पर उतरले आहेत. ते शिवसैनिक नाही तर भ्याड सैनिक. कारण शिवसैनिक दहा वेळा शब्द बदलत नाही किंवा दहा वेळा पक्ष बदलत नाही, अशी खोचक टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विजय शिवतारे यांच्यावर केली आहे. विजय शिवतारे यांनी बारामतीमध्ये आधी अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटले आणि नंतर माघार घेतली. यावरून अंधारेंनी ही प्रतिक्रिया दिली.

सुषमा अंधारे म्हणाल्या, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना समोरासमोर उभा करून भाजप गलिच्छ राजकारण करत आहे. कुटुंबात भाजपने फूट पाडली. लोकांनी अन्याय विरोधाची मशाल हातात घेतली आहे त्यामुळे विजयाची तुतारी नक्की वाजेल,

भाजपा नेते, खासदार उन्मेश पाटील हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत, याबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या, उन्मेश पाटलांचे माहिती नाही. पण हेमंत गोडसे आमच्याकडे कमबॅक करतील. शिंदे गटाकडून उमेदवारी मिळणार नाही. म्हणून गोडसे आमच्यासोबत येतील. भाजप सर्वेचे कारण दाखवत जास्त जागा पदरात पाडून घेत आहे.

वंचितबाबत प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, वंचितने आमच्यासोबत यावे, असे आम्हाला खूप आधीपासून वाटत होते आणि आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्यासाठी प्रयत्न केले. जर आम्ही प्रकाश आंबेडकरांचा योग्य सन्मान केला नाही. तर मला भाजपच्या लोकांना विचारायचा आहे की अजितदादांचा पाच जागा देऊन काय सन्मान केला? असा सवाल अंधारे यांनी केला.

Pune ACB Demand Trap Case | सातबारा नोंदीसाठी लाच मागणाऱ्या मध्यस्थावर पुणे एसीबीकडून गुन्हा

Related Posts