IMPIMP

Unauthorised Hoardings in Pune | घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेला आली जाग, पुण्यातील अनधिकृत होर्डिंग्ज कढायला सुरुवात (Video)

by sachinsitapure

पुणे :  – Unauthorised Hoardings in Pune | मागील काही दिवसांपासून राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळत आहे. या वादळी वाऱ्यामुळे मुंबईतील घाटकोपर (Hoarding Collapse In Mumbai Ghatkopar) येथे तब्बल 250 टनाचे होर्डिंग पडून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 70-80 जखमी झाले असून ढिगाऱ्याखाली 25-30 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, घाटकोपर येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर पुणे महानगर पालिकेला Pune Municipal Corporation (PMC) जाग आल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale) यांनी शहरातील अनिधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करुन ते 7 दिवसात हटवण्याचे आदेश दिले आहेत.

जे कारवाई करणार नाहीत त्यांना परिणांमांना सामोरे जावे लागेल, असा सज्जड दम डॉ. भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. पुणे महापालिका आयुक्तांनी स्वत: पुण्यातील रस्त्यावर फिरून या होर्डिंग्जचा आढावा घेतला आहे. पुणे शहरामध्ये जवळपास 2 हजार 598 होर्डिंग्ज आहेत. त्यापैकी अनेक होर्डिंग अनधिकृत असून यामुळे यावर तात्काळ कारवाई होणे अपेक्षित आहे. परंतु काही होर्डिंग उतरवत असताना कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पुण्यातील खंडोजी बाबा चौकातील (Khanduji Baba Chowk) अनधिकृत होर्डिंग्स काढायला सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसात शहरात अनेक ठिकाणी असलेली होर्डिंग्स काढली जाणार आहेत. पुण्यातील जाहिरात होर्डिंग्जबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागवला आहे. पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागात लावलेले होर्डिंग्सचा देखील अहवाल मागवण्यात आला आहे. परवानगी देण्यात आलेल्या सर्व जाहिरात फलकांचे स्थापत्या विषयक ऑडिट नव्याने करुन घेण्यास संबंधित जाहिरात फलक धारकाला कळवण्याचे या अहवालात नमूद केले आहे.

Global Icons of India Awards Pune | कला, सामाजिक, सांस्कृतिक  क्षेत्रातील मान्यवरांना  ‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ 2024  पुरस्कार जाहीर

Related Posts