IMPIMP

Vijay Wadettiwar | ड्रग्ज माफिया आणि गुन्हेगारी मुक्‍त शहर करायचे आहे; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर हल्लाबोल

by sachinsitapure
पुणे : Vijay Wadettiwar | सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र असलेल्या पुणे शहराला ड्रग्ज माफिया (Pune Drug Free) आणि गुन्हेगारीने विळखा घातला आहे. पुणे शहराला यामधून मुक्‍त  करायचे आहे. त्यामुळेच पुण्यातून जुमलेबाज सरकारला दुर करायचे असल्याचे विधासनसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी आशिष दुआ, गुजरात काँग्रेसच्या प्रवक्त्या  प्रगती आहिर, सहप्रभारी दादू खान,माजी आमदार मोहन जोशी प्रवक्ते गोपाळ तिवारी, अजित दरेकर, प्रकाश सोनावणे उपस्थित होते.
वडेट्टीवार म्हणाले, देशभरामध्ये बदलाचे वारे आहेत. त्यामुळे पुणे शहरामध्ये सुध्दा काँग्रेस पक्षाचा उमेदवार 1 लाख मतांनी विजयी होणार आहे. मराठावाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात इंडिया आघाडीचे (India Aghadi) वर्चस्व राहणार आहे. विदर्भातील सर्व 10 जागांवर इंडिया आघाडी विजयी होणार आहे. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू घसरली असून  प्रचाराची दिशा चुकलेल्या भाजपचा पराभव होणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
भाजपने 2014 मध्ये विकासाची चर्चा केली. 2019 मध्ये आश्‍वासने देण्यात आली विकास करता आली नाही. 2024 मध्ये मात्र भाजपची दयनीय अवस्था आहे. मोदींच्या प्रचाराला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे भाजपने आता भारत पाकिस्तानचा मुद्दा पुढे केला आहे. काँग्रेसने पाकिस्तानचे दोन तुकडे केले हे भाजपला माहित नाही का? यामुळे विकासच्या मुद्यावर सोडून धर्म आणि जातीय मुद्यावर निवडणूक घेवून जाण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यामधून भाजपची दयनीय अवस्था दिसून येत आहे असे वडेट्टीवार म्हणाले.
देशातील सत्ता बदलाची सुरुवात ही महाराष्ट्रातून होणार आहे. त्यामुळे ही  निवडणूक निर्णायक आहे. मी राज्यभर प्रचारासाठी फिरत आहे. कोल्हापुरमधील छत्रपती शाहु महाराज यांची जागा 4 ते 5 लाख मतांनी विजयी होणार आहे. पुण्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व इंडिया आघाडीचे (India Aghadi) उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे 1 लाख मतांनी विजयी होणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. राज ठाकरे यांचा हात कोठेतरी दाबला असावा, त्यामुळे ते भाजपचा प्रचार करत आहेत. मागिल निवडणुकांमध्ये त्यांनी विरोधात प्रचार केला होता. त्यांचा फायदा भाजपला होणार नाही. गद्दारांना राज्यातील जनता माफ करणार नाही असेही ते शेवटी म्हणाले.

Related Posts