IMPIMP

Viman Nagar Pune Crime | पुणे : क्रिकेट खेळताना गुप्तांगावर चेंडू लागला, 11 वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

by sachinsitapure

पुणे :  – Viman Nagar Pune Crime | क्रिकेट खेळताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने एका 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. ही घटना गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास लोहगाव येथील जगद्गुरू स्पोर्टस अकॅडमी मैदानात (Jagad Guru Sports Academy) घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शौर्य उर्फ शंभू कालिदास खांदवे (वय- 11 रा. लोहगाव, पुणे ) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. शौर्य हा कुस्तीपटू होता.

मिळालेल्या माहितीनुसार, शौर्य इयत्ता सहावी मध्ये शिकत होता. शाळेला सुट्ट्या लागल्याने गुरुवारी सायंकाळी घरातील इतर मुलांसोबत तो क्रिकेट खेळत होता. शंभूला खेळताना अचानक पुढून येणारा चेंडू गुप्तांगावर लागला. त्यावेळी अचानक तो मैदानात खाली कोसळला. त्यानंतर तो उठून उभा राहिला मात्र, त्याला वेदना होत होत्या. वेदना असह्य झाल्याने तो पुन्हा खाली पडला. त्यामुळे इतर मुले गोंधळून गेली. त्यांनी आरडाओरडा केल्याने जवळच्या नागरिकांनी शंभूला खासगी रुग्णालयात नेले. त्याठिकाणी डॉक्टरांनी शंभूला तपासून मृत घोषित केले.

शंभूचा मृतदेहाचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल असे विमानतळ पोलिसांनी सांगितले. शंभूच्या अचानक मृत्यू मुळे खांदवे कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे. शंभू हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती बंडू खांदवे यांचा पुतण्या होता.

Related Posts