IMPIMP

Vindo Tawade On Eknath Khadse | एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशाला फडणवीस, बावनकुळेंचा विरोध नाही – विनोद तावडे

by sachinsitapure

पुणे :  – Vindo Tawade On Eknath Khadse | भाजपमध्ये (BJP) एकनाथ खडसे यांचा प्रवेश होईल. खडसे यांच्या प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा विरोध नाही, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

विनोद तावडे म्हणाले, राज्यातील निर्णय केंद्रीय नेतृत्वाबरोबर चर्चा करुनच होतात. आमच्याकडे  आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने युती करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागितली. पण निवडून आल्यानंतर आमच्याशी गद्दारी केली. शिवसेनेचा ठाकरे गट आकड्यावर गेला. त्यामुळे आम्ही आकड्यावर गेलो. त्यांना धडा शिकवला आहे. देवेंद्र फडणवीस सुडाचे राजकारण करत नाहीत, असे विनोद तावडे यांनी सांगितले.

‘आयेगा तो मोदी’

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी मागील निवडणुकीप्रमाणेच आहे. मे महिन्यातील ऊन हे एप्रिल महिन्यातच जाणवत आहे. ‘आयेगा तो मोदी’ असे वातावरण आहे. 20 ते 30 टक्के बुथवर विरोधी पक्षाचे कार्यकर्ते दिसत नसल्याचे विनोद तावडे म्हणाले.

पराभवाच्या भीतीने राहुल गांधींनी मतदारसंघ बदलला

रायबरेलीमधून राहुल गांधी यांनी आज अर्ज दाखल केला आहे. पण राहुल गांधी यांच्या रायबरेलीच्या उमेदवारीवरुन विनोद तावडे यांनी टीका केली आहे. वायनाडमध्ये हारु की काय असे वाटत असल्याने प्रियांका गांधी यांना रायबरेलीमधून उमेदवारी न देता, राहुल गांधी यांना उमेदवारी घोषित केली आहे. रायबरेलीमधून प्रियांका गांधी या निवडणूक लढविणार हे जवळपास निश्चित झाले होते. पण मागील निवडणुकीत राहुल गांधी यांना अमेठीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. तसेच यंदाच्या निवडणुकीत वायनाडमध्ये जे चित्र उभे राहिले हे लक्षात आल्यावर वायनाडमध्ये पराभव होण्याच्या भीतीने राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत विनोद तावडे यांनी राहुल गांधींना टोला लगावला.

Related Posts