IMPIMP

Warje Malwadi Pune Firing Case | वारजे गोळीबार प्रकरण : पुण्यातील आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून अटक, पिस्टल जप्त (Video)

by sachinsitapure

पिंपरी : – Warje Malwadi Pune Firing Case | बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha) मतदान झाल्यानंतर पुण्यातील वारजे भागात तिघांनी गोळीबार (Firing In Pune) केल्याची घटना घटना मंगळवारी (दि.7) रामनगर मध्ये रात्री अकराच्या सुमारास घडली होती. गोळीबार करुन फरार झालेल्या एका सराईताला (Criminal On Police Record) पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) गुन्हे शाखा युनिट दोन ने (Pimpri Chinchwad Crime Branch) अटक केली आहे.

सिद्धप्पा मल्लिकार्जुन यळसंगीकर (वय-35 रा. यळसंगी ता. आळंद जि. गुलबर्गा राज्य कर्नाटक सध्या रा. कोथरुड डेपो, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रकरणी पोलीस अंमलदार हेमकांत पवार यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर यापूर्वी खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस अधिकारी व अंमलदार लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने पिंपरी भागात पेट्रोलींग करुन रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सागर अवसरे व अजित सानप यांना माहिती मिळाली की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील सिटी प्राईड हॉटेल येथे एक व्यक्ती कमरेला पिस्टल लावून फिरत असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. त्यावेळी आरोपीने कमरेचे पिस्टल काढून फायरिंग करण्याचे व उडी मारुन पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला झडप घालून ताब्यात घेऊन पिस्टल आणि काडतुस जप्त केले.

आरोपीकडे सखोल चौकशी केली असता 7 मे रोजी रामनगर येथील प्रणव सुपर मार्केट समोर लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी तिघांनी पिस्टलमधून दोन राऊंड हवेत गोळीबार केला. तसेच आम्ही इथले भाई आहोत असे म्हणत लोकांना शिवीगाळ करुन परिसरात दहशत निर्माण केली. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले. आरोपी सिद्धप्पा यळसंगीकर याच्यावर सिंदगी पोलीस ठाण्यात दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामिनावर सुटला असून पुण्यात कामासाठी आला होता. त्याने गोळीबार केल्याची कबुली दिली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस फौजदार शिवानंद स्वामी, दिलीप चौधरी, संतोष इंगळे, सागर अवसरे, नामदेव कापसे, आतिष कुडके, देवा राऊत, अजित सानप, शिवाजी मुंडे यांच्या पथकाने केली.

Ajit Pawar On Amol Kolhe | अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टीका, म्हणाले, नाटक सिनेमाच्या शूटिंगमुळे खासदारांना वेळ मिळेना

Related Posts