IMPIMP

Pune Police | पुण्यातील पोलिस निरीक्षकानं इंटेरिअर डेकोरेटरच्या कानाखाली पिस्तुल लावल्यानं प्रचंड खळबळ; समर्थ पोलिस ठाण्यात ‘नोंद’

by nagesh
Pune Crime | Pune criminals Ganesh Chaudhary and Ajay Vishwakarma are deported from Pune district for two years

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) :  Pune Police | घराचे इंटेरियर डेकोरेशनेचं (Interior decoration) काम व्यवस्थित झाले नाही म्हणत पुणे पोलीस (Pune Police) दलातील एका पोलीस निरीक्षकाने इंटेरियर डेकोरेटरच्या कानाखाली पिस्तुल (Pistol) लावून दिलेले पैसे परत मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित पोलीस निरीक्षक वाहतुक शाखेत (traffic branch) कार्यरत असून त्यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पुणे पोलीस (Pune Police) दलात खळबळ उडाली आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

राजेश पुराणीक (Police Inspector Rajesh Puranik) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी कार्तिक रामनिवास ओझा (Kartik Ramniwas Ojha) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार दिली आहे. राजेश पुराणीक (Rajesh Puranik) यांनी कानाखाली पिस्तूल लावून मारहाण केली. तसेच कुटुंबीयांचाही मानसिक छळ केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. राजेश पुराणिक हे समर्थ वाहतूक विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

 

फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पुराणिक हे रहात असलेल्या नाना पेठ (Nana Peth) परिसरातील घराचे इंटेरिअर डेकोरेशनचे काम करण्यास दिले होते. घराचे 70 टक्के काम पूर्ण झाल्यावर पुराणिक यांच्याकडे कामगारांचे पैसे देण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यावेळी पुराणिक यांनी कामामध्ये त्रुटी (किरकोळ चुका) काढल्या. तसेच काम व्यवस्थित झाले नसल्याचे म्हणत पैसे देण्यास नकार दिला. तसेच कायदेशीर कारवाई (Legal action) करण्याची धमकी दिली. ते आठ दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारे धमक्या तसेच पैशांची मागणी करत आहेत असा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.. तसेच कुटुंबातील सदस्यांना मानसिक त्रास देत आहेत.

 

 

दरम्यान, पुराणिक यांनी ओझा यांना समर्थ वाहतुक विभागात सर्व कागदपत्रे घेऊन बोलावले.
त्याठिकाणी पैसे दिले नाहीत म्हणून बुटाने व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली असा आरोप
तक्रारीत करण्यात आला आहे.. यानंतर कानाखाली पिस्तूल लावून दम देत कागद पत्रांवर सही
घेतली. मोबाईल बळजबरीने घेऊन संपर्कातील व्यक्तींना चुकीचे संदेश पाठवले. याप्रकरणी कार्तिक
ओझा यांच्या बहिणीने पोलीस आयुक्त कार्यालयात (Police Commissioner Office) तक्रार
अर्ज दिला होता. तसेच समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जावरुन पोलीस
निरीक्षक (वाहतूक विभाग) राजेश पुराणिक यांच्यावर अदखलपात्र गुन्हा (non cognizable offence) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Web Title : Pune Police | Excitement after a police inspector Rajesh Puranik put a pistol under the ear of an interior decorator; non cognizable offence registered in Samarth police station against PI puranik

 

हे देखील वाचा :

BJP Maharashtra | झारखंडमध्ये सरकार पाडण्याच्या षडयंत्राचे महाराष्ट्र भाजपशी ‘कनेक्शन’? नेते अडचणीत येण्याची शक्यता

Pune Railway Station | पुणे रेल्वे स्टेशनचे 97 व्या वर्षात पदार्पण

Pollution And Coronavirus | सावधान ! प्रदूषणामुळे सुद्धा पसरतो कोरोना, भयावह आहे रिसर्चमध्ये झालेला खळबळजनक खुलासा

Maharashtra Rain Alert | कोल्हापूर, रायगडसह रत्नागिरीवर पुन्हा मुसळधार पावसाचं संकट, पुण्यासह ‘या’ 6 जिल्हयांना ‘यलो अलर्ट’

 

Related Posts