IMPIMP

Pune Railway Station | पुणे रेल्वे स्टेशनचे 97 व्या वर्षात पदार्पण

by nagesh
Pune Station platform ticket for rs 10 again at pune station reduced from earlier price 50

पुणे न्यूज (Pune News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online): Pune Railway Station | मुंबई आणि ठाण्याखालोखाल असलेले पुणे रेल्वे स्टेशन हे राज्यातील सर्वात जुने स्टेशन आहे. आज 27 जुलै 2021 रोजी पुणे रेल्वे स्टेशन 97 व्या वर्षांमध्ये पदार्पण करीत आहे. पुणे रेल्वे स्टेशन (Pune Railway Station) हे ब्रिटिशांनी बांधलेले आणि हेरिटेज स्ट्रक्चरचा दर्जा मिळालेले रेल्वे स्टेशन आहे. आता हे रेल्वे स्टेशन 97 वर्षाचे झाले आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पुणे रेल्वे स्टेशनचा आराखडा 1915 रोजी ब्रिटिशांनी तयार केला आहे. तर, वास्तुविशारद पी. विल्सन (P. Wilson) यांच्या मार्गदर्शनाखाली 1925 साली स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. या स्टेशनच्या उद्घाटन समारंभ मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन (Sir Leslie Wilson, Governor of Mumbai) यांच्या उपस्थितीत पार पडला गेला. त्यावेळी मुंबईहून एक विशेष रेल्वे पुण्यात आणली गेली होती. तेव्हा स्टेशनच्या उभारणीसाठी जवळजवळ 5 लाख 79 हजार रुपये खर्च आला होता. स्टेशनला वीस वर्षांपूर्वी मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून गौरविण्यात देखील आलेत. दरम्यान, आशिया खंडातील पहिली डबल डेकर सिंहगड एक्स्प्रेस आणि पुणे- मुंबई लोहमार्गाचे विद्युतीकरण ही या स्टेशनची देणगी आहे. तसेच, वर्धापन दिन मंगळवारी साजरा केला जाणार आहे. अशी माहिती रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा (Harsha Shah) यांनी दिलीय.

 

 

या दरम्यान, प्रारंभी मुंबई-पुणे (Mumbai-Pune) मार्गापुरते मर्यादीत असलेल्या पुणे स्टेशनचा (Pune Railway Station) त्याच्या कालांनंतर विस्तार होत गेला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता मर्यादित गाड्या आणि प्रवासी सुरु असले, तरी इतर वेळी या स्थानकावरून जवळपास 225 रेल्वेगाड्यांची वाहतूक होते, तसेच, जवळपास 2 लाख प्रवाशांचा प्रवास घडतोय.
दरम्यात, पुणे स्थानकाच्या विस्तारीकरणाला लिमिट असल्याने आता हडपसर रेल्वे स्थानक (Hadapsar railway station) विकसित करण्यात येत असल्याच सांगण्यात आले आहे.

 

 

Web Title : pune railway station 97 years

 

हे देखील वाचा :

Pollution And Coronavirus | सावधान ! प्रदूषणामुळे सुद्धा पसरतो कोरोना, भयावह आहे रिसर्चमध्ये झालेला खळबळजनक खुलासा

Maharashtra Rain Alert | कोल्हापूर, रायगडसह रत्नागिरीवर पुन्हा मुसळधार पावसाचं संकट, पुण्यासह ‘या’ 6 जिल्हयांना ‘यलो अलर्ट’

Wakad Police | सराईत 3 वाहन चोरटे गजाआड, 2.5 लाखांच्या 7 दुचाकी जप्त

 

Related Posts