IMPIMP

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांंची टीका; म्हणाले – ‘शिवसेनेचा पासिंग स्ट्राईक रेट होता, पण आमचा…’

by nagesh
Devendra Fadnavis | BJP leader devendra fadanvis bjp will win in all upcoming elections says devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Devendra Fadnavis | पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवणाऱ्या टीएमसीच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या काल (बुधवारी) महाराष्ट्र दौ-यावर होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) रुग्णालयात दाखल असल्यामुळे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये (mumbai trident hotel) जाऊन ममता यांची भेट घेतली. ममता यांच्या दो-यावरुन भाजप पक्षाकडून टीका होत असताना शिवसेनेनेही भाजपला (BJP) प्रत्युत्तर दिलंय. या पार्श्वभुमीवर आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) हल्लाबोल केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ‘शिवसेनेचा स्ट्राईकरेट हा आमच्यापेक्षा कमी होता, अशी आठवणही फडणवीसांनी संजय राऊत आणि शिवसेनेला करून दिलीय. तर, संजय राऊतांनी भाजपावर टीका केल्यानंतर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘संजय राऊत इतक्या मोठ्या बाता करतायत, त्यांचे किती निवडून आले? 56 निवडून आले आहेत. त्यांचा 40-42 टक्के असा पासिंग स्ट्राईकरेट होता. आमचा 70 टक्के होता. त्यामुळे कुणाला महाराष्ट्रातल्या लोकांनी पळवून लावलं हे निवडणुकीतून स्पष्ट झालंय, ते पुढच्या निवडणुकीतही स्पष्ट होईल.

 

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ‘भाजपाविरोधी विरोधकांची आघाडी करण्याच्या प्रयत्नांवर आणि
शिवसेनेच्या समर्थनावरही फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडलं.
‘मला वाटतं की संजय राऊत असतील किंवा शिवसेना असेल, यांनी कितीही लांगुलचालन केलं, तरी त्यांना फायदा होणार नाही.
पण एक चांगलंय. आता मतांच्या लाचारीमध्ये त्यांना हिंदुत्वविरोधी पक्षांना डोक्यावर घेऊन हिंडावं लागतं,
हा त्यांचा खरा चेहरा आता उघड झाला आहे, असं फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis mocks sanjay raut shivsena on mamata banerjee sharad pawar meet

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सरपंच, उपसरपंचाच्या त्रासाला कंटाळून ग्रामपंचायत शिपायाने कार्यालयातच घेतला गळफास; परिसरात खळबळ

Pune Crime | 16 वर्षाच्या युवतीचा गर्भपात, प्रियकर व त्याच्या त्याचा डॉक्टर मित्राला अटक

UGC Scholarship 2021 | विद्यार्थ्यांनी भरावा यूजीसी शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज, मिळतील 7,800 Rs प्रति महिना; जाणून घ्या

 

Related Posts